गडहिंग्लज युनायटेड, कोल्हापूर (ड)चे विजय

गडहिंग्लज युनायटेड, कोल्हापूर (ड)चे विजय

83008

गडहिंग्लज युनायटेड, कोल्हापूर (ड) विजयी
शिवशाहू रायझिंग स्टार्स फुटबॉल स्पर्धा ः चौदा, सोळा वर्षाखालील फुटबॉल स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर ः शिवशाहू रायझिंग स्टार्स फुटबॉल स्पर्धेत सोळा वर्षाखालील गटात गडहिंग्लज युनायटेड संघाने कोल्हापूर फुटबॉल संघ (अ) चा ३-२, तर चौदा वर्षाखालील गटात गडहिंग्लज युनायटेड (ड)ने कोल्हापूर फुटबॉल संघ (ड) चा ४-० असा पराभव करीत आगेकूच केली. या सामन्यांत अनमोल तरवाळने हॅट्रिक केली.
छत्रपती शाहू स्टेडियमवर आज सोळा वर्षाखालील गटात गडहिंग्लज युनायटेड संघाने कोल्हापूर फुटबॉल संघ (अ) यांच्यात सामना झाला. सामन्यात गडहिंग्लजकडून १४ व्या मिनिटास सुहास पाटीलने, तर २० व्या मिनिटास समर्थ चावरे आणि उत्तरार्धात सौरभ शिंदे याने गोल केले. कोल्हापूर संघाकडून पृथ्वी बागडेकरने दोन गोल नोंदविले.
छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर चौदा वर्षाखालील गटात गडिहंग्लज (ड) व कोल्हापूर (ड) यांच्यात झाला. सामन्यांच्या सुरुवातीपासूनच गडहिंग्लज संघाचे सामन्यावर वर्चस्व राहिले. त्यांच्या अनमोल तरवाळने सलग तीन गोल नोंदवित स्पर्धेतील पहिल्या हॅट्रीकची नोंद केली. अलोक पाटीलने एक गोल नोंदवित संघाच्या विजयात हातभार लावला. दुपारच्या सत्रात झालेल्या चौदा वर्षाखालील संघात कोल्हापूर (ड) ने गडहिंग्लजच्या अन्य संघाचा पराभव केला. यात कोल्हापूरकडून वरद पोवार, ईशान नारायणपुरे यांनी हे गोल नोंदविले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com