शहाजी लॉ कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ*

शहाजी लॉ कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ*

83009

समाजातील बदलांचा अभ्यास करा

कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे : शहाजी लॉ कॉलेजमध्ये बक्षीस वितरण

कोल्हापूर, ता. ११ : ‘‘समाजातील बदलांचा अभ्यास करा. बदलत्या पिढ्यांनुसार माणसांच्या स्वभावात बदल होत आहे. स्वार्थी स्वभावामुळे समस्त मानवजातीसह जीवसृष्टीचेही नुकसान होत आहे,’’ असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले. येथील शहाजी लॉ कॉलेजमध्ये वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम होते.
डॉ. शिंदे म्हणाले, ‘आम्ही फक्त स्वत:पुरतेच बघतो. तुम्हाला जे मिळत असते त्यात लोकांचा वाटा असतो हे सदैव ध्यानी ठेवा. दुसऱ्यासाठी म्हणजेच समाजासाठी अलौकिक काम करा. आजची पिढी पैसा कमवू शकते. परंतु; स्वास्थ्य नाही. पाश्चात्य राष्ट्रात कायदा आणि निसर्गज्ञान हे मूलभूत आहे. वकिलांनी कोणत्याही गोष्टीचे मूळ जाणून घ्यावे आणि ध्येय गाठण्यासाठी मनापासून प्रयत्न करावेत.’
व्यासपीठावर डॉ. विश्वनाथ मगदूम, सदस्य ॲड. वैभव पेडणेकर आणि ॲड. अमित बाडकर, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. एस. नाईक, प्रा. डॉ. अतुल जाधव, प्रा. डॉ. सुहास पत्की, प्रा. डॉ. सुचिता सुरगीहळ्ळी, ग्रंथपाल कैलास पवार उपस्थित होते. जिमखानाप्रमुख प्रा. डॉ. एम. सी. शेख यांनी स्वागत केले. प्राचार्य डॉ. प्रवीण पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. सविता रासम पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा.स्वाती गावडे व प्रा. पीनाज सय्यद यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थी प्रतिनिधी मंजिरी कुलकर्णी यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com