वर्गमित्र आले २९ वर्षांनी एकत्र

वर्गमित्र आले २९ वर्षांनी एकत्र

83144
मलिग्रे (ता. आजरा) : येथे मलिग्रे हायस्कूलमधील दहावीच्या १९९५ बॅचचे एकत्रित आलेले विद्यार्थी व शिक्षक.

वर्गमित्र आले २९ वर्षांनी एकत्र
मलिग्रेत स्नेहमेळावा; वारकरी मंडळाचा रौप्य महोत्सवही उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १२ : मलिग्रे (ता. आजरा) येथे तब्बल २९ वर्षांनी वर्ग मित्र एकत्रित आले. मलिग्रे हायस्कूल शाळेतील दहावीच्या १९९५ च्या विद्यार्थी व विद्यार्थींनीचा स्नेहमेळावा झाला. या वेळी हायस्कूलमधील जून्या आठवणींना उजाळा मिळाला. श्री माऊली वारकरी संप्रदाय मंडळ, मलिग्रे व कागीणवाडी यांचा रौप्य महोत्सवही झाला. विद्यार्थांनी या निमितान्ने ५००० पेक्षा अधिक ग्रामस्थांना महाप्रसादाचे वाटप केले.
यावेळी मराठी विद्यामंदिर व मलिग्रे हायस्कूलमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांना निमंत्रण दिले होते. शिक्षकांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मुर्तीचिन्ह, भेटवस्तू देवून सन्मान करण्यात आला. गुरुजनांचे विद्यार्थांनी आभार मानले.
विद्यार्थांनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला. वनभोजन, वेगवेगळे खेळ, पंधरा ऑगस्ट, सव्वीस जानेवारीचे कार्यक्रमानिमित्त काढलेली प्रभात फेरी, सहली त्याचबरोबर शिष्यवृत्तीची परीक्षा अशा अनेक आठवणी जाग्या झाल्या. माजी मुख्याधापक (कै) चिंचणेकर यांनी शिकवलेली रायगडला जेव्हा जाग येते, नटसम्राट ही नाटक तसेच बटाट्याची चाळ हा विनोदी कथासंग्रह याबाबतच्या आठवणी ताज्या जागविण्यात आल्या. या बॅचमधील चौघा मित्रांचे निधन झाले आहे. त्यांच्या घरी जावून त्यांच्या आई-वडिलांना साडी चोळी, टाँवेल टोपी देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. भारतीय सैन्यातून सेवा निवृत्त सुरेश कागीणकर, विजय इंजल, भारतातील अग्रगण्य कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कापसे, अस्मिता कुरळे, ॲड. चंद्रकांत निकम, दुबईमध्ये उच्च अधिकारी पदावर काम करत असलेले बबन सावंत यांचाही गुरुजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांसह शिक्षक उपस्थित होते. अॅड. चंद्रकांत निकम यांनी आभार मानले.䡕

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com