जयंती नाला

जयंती नाला

83200

जयंती नाल्यात वाहून आलेला
कचरा कर्मचाऱ्यांनी काढला

कोल्हापूर, ता. १२ ः वळीव पावसाने शनिवारी झोडपल्यानंतर जयंती नाल्यात वाहून आलेला प्लास्टिक, तसेच इतर कचरा आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढला. जयंती नाला उपसा केंद्राजवळ सांडपाणी ओसंडून वाहत असताना कर्मचाऱ्यांकडून सफाई करण्यात आली.
जयंती तसेच गोमती नाल्याची सफाई महापालिकेच्या पोकलॅनद्वारे केली आहे. त्यानंतर तेथील प्लास्टिक, तसेच इतर कचरा वाहून सुतारवाड्याजवळ थांबला होता. तिथेही सफाई झाल्यानंतर तो सर्व जयंती नाला उपसा केंद्राजवळील बंधाऱ्याजवळ अडकला होता. शनिवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने नाल्यातून सांडपाणी ओसंडून वाहत होते. पण, बंधाऱ्याला असलेल्या फळ्यामुळे कचरा अडून राहिला होता. त्यामुळे सहायक आयुक्त कृष्णा पाटील यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून तो कचरा काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार दिवसभर कर्मचारी कचरा बाजूला काढण्याचे काम केले. त्यासाठी जेसीबी व १५ कर्मचाऱ्यांनी काम केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com