संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

83199
प्रमोद कोळी यांना
पीएचडी पदवी प्राप्त
कोल्हापूर ः येथील शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विषयातून प्रमोद बाळासाहेब कोळी यांनी पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. त्यांचा ‘माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी विवेकनिष्ठ विचार कार्यक्रम विकसन, एक अभ्यास’ हा संशोधनाचा विषय होता. त्यांनी शिक्षणशास्त्र अधिविभाग सहाय्यक प्राध्यापक व दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. के. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण केले. प्रमोद कोळी यांचे शिक्षण कोल्हापूर येथील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण प्रायव्हेट हायस्कूल व राजाराम कॉलेज येथे झाले. ते सध्या पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे समन्वयकपदी कार्यरत आहेत. त्यांना पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका शिल्पा कपूर यांचे सहकार्य मिळाले.
--------
83208
वडिलांच्या वर्षश्राद्धाला
पंचगंगा स्मशानभूमीस शेणीदान
कोल्हापूर, ता. १२ ः महापालिकेचे निवृत्त सहाय्यक अधीक्षक पांडुरंग यशवंत सरनाईक यांच्या तिसऱ्या वर्षश्राद्धानिमित्ताने त्यांच्या कुटुंबीयांनी पंचगंगा स्मशानभूमीस ५ हजार शेणी दान केल्या. यावेळी लक्ष्मीबाई सरनाईक, रवींद्र सरनाईक, किरण सरनाईक, उज्ज्वला उलपे, सुभाष सरनाईक, शर्वरी सरनाईक, मानसी सरनाईक, प्रथमेश सरनाईक, मानली उलपे, अर्चिशा सरनाईक, अथर्व सरनाईक, रणवीर सरनाईक, शिवम सरनाईक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com