आईने विकलेल्या चिमुकलीचा बापानेच घेतला शोध

आईने विकलेल्या चिमुकलीचा बापानेच घेतला शोध

83254
...
आईने विकलेल्या चिमुकलीचा
अखेर बापानेच घेतला शोध
लक्ष्मीपुरी पोलिस बंदोबस्तात व्यस्त ः गोव्यातील दांपत्याकडून घेतला ताबा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ ः कौटुंबिक वादातून आईनेच एक वर्षाच्या मुलीला गोव्यातील दांपत्याला विकल्याचा प्रकार समोर आला होता. लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा दाखल असूनही लोकसभा निवडणूक बंदोबस्ताचे कारण सांगून चिमुकलीच्या शोधात चालढकल सुरू होती. एक पथक यापूर्वी गोव्यात शोध घेऊन रिकाम्या हाती परतले होते. अखेर वडील दिलीप ढेंगे (वय ३०) यांनी स्वतःच धडपड करत चिमुकल्या संस्कृतीचा शोध घेतला. एप्रिल महिन्यात तिचा वाढदिवस साजरा न करता आल्याने तिला घरी आणल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला.
इंगळी येथील पूनम ढेंगे हिचा पती दिलीपसोबत वाद झाला होता. यातून दोघेही वेगळे राहात होते. अशात पूनम हिने तिचा मित्र व त्याच्या साथीदारांच्या मदतीने एक लाख रुपयांसाठी आपल्या चिमुकल्या मुलीला गोव्यातील दांपत्याला नोटरी नोंदवून परस्पर दिल्याचे समोर आले. यामुळे पती दिलीपने पोलिसांत धाव घेतली होती. पोलिसांनी याप्रकरणी २७ एप्रिलला पूनम ढेंगे, तिचा मित्र सचिन कोंडेकर, मध्यस्थी किरण पाटील या तिघांना अटकही केली होती.
...
गोव्यात चिमुकलीचा शोध....
चिमुकलीला गोव्यातील ज्या दांपत्याकडे देण्यात आले होते, त्यांच्या पत्त्यावर लक्ष्मीपुरी पोलिसांचे पथक धडकले; परंतु संबंधित महिला त्याठिकाणी मिळून आली नाही. तर तिचा पतीही विदेशात गेल्याचे समोर आले. यामुळे फिर्यादी दिलीप ढेंगे हवालदिल झाले होते.
...
पोलिस बंदोबस्तात व्यस्त
चिमुकल्या संस्कृतीला पाहण्यासाठी वडिलांची तळमळ सुरू होती. गोव्यामध्ये संबंधित महिला मिळून आली का, याची विचारणा ते वारंवार पोलिसांकडे करीत होते. काही मित्रांच्या मदतीने ते गोव्यातही जाऊन आले. अखेर एका वकिलांच्या मध्यस्थीने ढेंगेंचा मुलीला घेणाऱ्या संबंधित महिलेशी संपर्क झाला. मुलगी परत हवी असल्याची त्याने विनवणी केल्यानंतर त्या महिलेनेही चिमुकली बापाकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला.
...
संस्कृतीचा वाढदिवस जल्लोषात....
एप्रिल महिन्यात संस्कृतीचा वाढदिवस होता; पण ती गोव्यातील महिलेकडे असल्याने तिच्या वडिलांच्या मनाला हुरहूर लागून होती. दोन दिवसांपूर्वीच तिला घेऊन दिलीप ढेंगे कोल्हापुरातील घरी परतल्यानंतर कुटुंबीय, नातेवाईकांसोबत मिळून संस्कृतीचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com