संभाजी महाराज जयंती

संभाजी महाराज जयंती

फोटो 83256

शंभूराजे जयंतीनिमित्त
रक्तदान शिबिरांचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ ः शिवाजी पेठेतील श्री राजे संभाजी तरुण मंडळातर्फे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आजपासून विविध उपक्रमांना प्रारंभ झाला. रक्तदान शिबिरात ऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केले.
ज्येष्ठ नागरिक बाबूराव हराळे, अनिल उगळे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. वसंतराव मुळीक, सूर्या सावंत, संजय आंग्रे आदी उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष अनिकेत चौगुले यांनी मंडळाच्या वाटचालीचा आढावा घेतला. आमदार जयश्री जाधव यांनी उपक्रमाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. दिग्विजय मोरे, अमित मरळकर, सिध्देश चौगुले, स्वप्नील सरनाईक, विनोद शिंदे, प्रतीक सरनाईक, गिरीश जाधव, सागर देसाई, सुधीर कदम, मनोज चौगुले, सतीश कुसुंबे, राजू साळुंखे, सचिन जाधव, सुधीर जाधव आदींनी संयोजन केले. मिलिंद चव्हाण यांनी आभार मानले.

कोल्हापूर मर्दानी खेळ
संस्थेतर्फे उद्या रक्तदान शिबिर
कोल्हापूर मर्दानी खेळ संस्थेतर्फे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मंगळवारी (ता.१४) रक्तदान शिबिर होणार आहे. महाराष्ट्र हायस्कूल येथे सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत शिबिर होणार आहे. सायंकाळी पाच वाजता मर्दानी खेळाची चित्तथरारक प्रात्यक्षिके आणि त्यानंतर ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com