हज यात्रेकरुंसाठी उद्या लसीकरण

हज यात्रेकरुंसाठी उद्या लसीकरण

जिल्ह्यातील हज
यात्रेकरूंसाठी उद्या लसीकरण
कोल्हापूर, ता. १२ ः यंदा जिल्ह्यातून चारशे हज यात्रेकरू हज कमिटी ऑफ इंडियातर्फे हज यात्रेला जाणार आहेत. या यात्रेकरूंना ‘मेनिनजायटीस’ ही उष्णता प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. मंगळवारी (ता. १४) सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंग येथे लसीकरण होणार आहे.
छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा सरकारी रुग्णालय, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, हज फाउंडेशन, लिम्रास चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम होणार आहे. राज्य हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इम्तियाज काझी यांची प्रमुख उपस्थिती असेल. या वेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, डॉ. असिफ सौदागर, डॉ. अर्जुन आडनाईक यांचे मार्गदर्शन होणार आहे.
जिल्ह्यातील हज यात्रेकरूंनी मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट व कोविड लसीकरण प्रमाणपत्र साक्षांकित प्रतीसह घेऊन मुस्लिम बोर्डिंग येथे उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. दरम्यान, सत्तर वर्षांवरील हज यात्रेकरूंना दुसरा डोस, तसेच खासगी टूर ऑर्गनायजेशनच्या वतीने हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना मेनिनजायटीस लसीकरणासाठी लवकरच व्यवस्था केली जाणार असल्याचे हज फाउंडेशनचे अध्यक्ष समीर मुजावर, लिम्रास चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष इक्बाल देसाई यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com