const e=e=>{const o=window.location.origin;navigator.sendBeacon(`${o}/scooby/api/v1/log/event`,JSON.stringify(e))};e({page_url:window.location.href,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),(()=>{const o=window.history.pushState;window.history.pushState=new Proxy(o,{apply:(o,r,n)=>{const t=window.location.href,i=o.apply(r,n),a=window.location.href;return t!==a&&e({page_url:a,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),i}})})();
कोल्हापूरकरांचा‘ऑफबीट’ पर्यटनाकडे वाढला कल

कोल्हापूरकरांचा‘ऑफबीट’ पर्यटनाकडे वाढला कल

‘ऑफबीट’ पर्यटनाकडे कोल्हापूरकरांचा वाढला कल
लडाखसह आदीकैलाश, गुरूदोंगमार लेकला पसंती; दहा हजारांहून अधिकजणांचे बुकींग

सचिन भोसले ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः पर्यटनाच्या नियमित ठिकाणांपेक्षा काहीतरी वेगळेपणा आणि निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी लडाखसह चीनलगतच्या पण सिक्कीममधील हंग्ले, झुलुक, ओबलींग, गुरूदोंगमार लेक, आदीकैलाश पर्वत, सिल्क रुट आदी ठिकाणांच्या ऑफबीट पर्यटनस्थळांना भेट देण्याकडे कोल्हापूकरांचा कल वाढला आहे. यंदाच्या हंगामात दहा हजारांहून अधिक जणांनी या ठिकाणांना भेट देण्यासाठी आगाऊ नोंदणी केली आहे.
आजकाल घड्याळ्याच्या काट्यावर अनेकांचे जीवन सुरू आहे. यात शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि करिअर अशा चक्रात सर्वसामान्य अडकला आहे. या नियमित जीवनातून थोडीशी जीवाला विश्रांती मिळून, सहकुटूंब असो वा मित्रपरिवारासोबत पर्यटन केल्याने मनोरंजन, आनंद मिळतो. याच आनंदाच्या शोधात काही मंडळी नियमित पर्यटनाला भेट देण्यापेक्षा वेगळ्या एकाच ठिकाणावर जास्तीत जास्त दिवस राहण्यासाठी प्राधान्य देऊ लागली आहेत. त्यामुळे लडाख असो वा पूर्व सिक्कीम, उत्तरांचल, चीनलगतच्या काही अपरिचित पर्वतांना भेट देण्यास एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीतील हंगामाकरीता दहा हजारांहून अधिक जणांनी उत्सुकता दाखविली आहे.
............................
चौकट
कोल्हापूरकरांना या ठिकाणांचे आकर्षण
हिमालयातील मनाली-लेह रस्त्यावरील १९ हजार फुटांवरील खार्दुंला पास, ओबलिग, पूर्व सिक्कीमजवळील झुलुक आणि चीनच्या सीमेलगतच्या व तिबेटशी साधर्म्य असलेल्या हॉग्ले, नार्थ सिक्कीममधील लाचेन व्हॅली, यादोंग व्हॅली, गुरूदोंगमार लेक, सिल्क रुट यासह आदीकैलाश पर्वताला भेट देण्यास उत्सुकता दाखविली आहे. विशेष म्हणजे आदीकैलाश पर्वताला जाण्यासाठी १२५ हून अधिक किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. आता थेट रस्ते झाल्यामुळे या पर्वतालगत कारने जाता येते. यासह झांसकर व्हॅली या पर्वतरांगानाही भेट देण्यास प्राधान्य दिले आहे.
.........
दृष्टिक्षेपात...
-आवडीप्रमाणे निसर्गाचा आनंद घेण्याची संकल्पना रुजूत आहे. एकाच ठिकाणी जास्त काळ राहण्याचा कल
-अशा पर्यटनांना भेट देण्यासाठी या परिसरातील भूगोलाचा अभ्यास महत्त्वपूर्ण
-देशांतर्गत विमान सेवेमुळे या पर्यटनाचा वाढला कल
-ऑनलाईन बुकींगमुळे फसवणुकीचा धोकाही वाढला
.............
कोट
ही पर्यटनस्थळे अतिशय सुंदर आणि निसर्गाच्या जवळ जाणारी आहेत. रस्ते कनेक्टिव्हिटी, देशांतर्गत विमान सेवा आदी सुविधांमुळे नियमित काश्‍‍मीर, कुलुमनाली, पहलगाम, सोनमर्ग, गंगटोक, दार्जिलिंग या पलीकडे जाऊन पर्यटनाला कोल्हापूरकर प्राधान्य देऊ लागले आहेत.
-विनोद कांबोज, संचालक, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com