आजऱ्यात शिवसेनेचा संभाजी चौकात रास्ता रोको

आजऱ्यात शिवसेनेचा संभाजी चौकात रास्ता रोको

83334
आजरा : येथील संभाजी चौकात शिवसेनेने रास्ता रोको केला.
...

आजऱ्यात शिवसेनेचा रास्ता रोको
अधिकारी धारेवर : पाणी प्रश्‍नासह महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत विचारला जाब
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १३ : आजरा शहरात विस्कळीत झालेला पाणीपुरवठा व संकेश्वर- बांदा महामार्गाचे शहरात रखडलेले काम या प्रश्नाबाबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने संभाजी चौकात रास्ता रोको केला. नगरपंचायतीचे अधिकारी व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांना जाब विचारत पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. येत्या आठ दिवसांत याबाबत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देण्यात आला. रास्ता रोकोमुळे आजरा-आंबोली, आजरा-गडहिंग्लज व आजरा-महागाव मार्गावरील वाहतूक सुमारे पाऊण तास ठप्प होती.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी चौकात ठिय्या मारला.
प्रा. शिंत्रे म्हणाले, ‘राष्ट्रीय महामार्गाचे व नगरपंचायतीचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी टाळत असतील तर ही गोष्ट निषेधार्थ आहे. याचा शिवसेना धिक्कार करीत आहे.’ तालुकाप्रमुख युवराज पोवार म्हणाले, ‘अधिकाऱ्यांकडे एखाद्या प्रश्नाबाबत किती वेळा निवेदने द्यायची, प्रत्येक प्रश्नाबाबत रस्त्यावर उतरावयाचे का?.’ दयानंद भोपळे म्हणाले, ‘रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली. ती पुन्हा लावण्यासाठी कोणती कार्यावही केली?.’
याबाबत नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी राकेश चौगले, बांधकाम विभागाचे निहाल नायकवडी, नळ पाणीपुरवठ्याचे जोशी, राष्ट्रीय महामार्गचे कनिष्ठ अभियंता अनिल पाटील यांच्यशी चर्चा करण्यात आली. कार्यवाहीबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दाखवली. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक नागेश चौगुले उपस्थित होते. आराम गाड्यांचे शहराबाहेर पार्किंग करावे. रस्त्यावरील वाहने हटवावीत. ठिकठिकाणी नो पार्किंगचे फलक लावावेत. फूटपाथवरील खोकी हटवून पादचाऱ्यांसाठी खुली करावीत, या मागण्यांवरही चर्चा झाली. यावेळी शहरप्रमुख ओमकार माद्याळकर, महेश पाटील, गुंडू खेडेकर, दिलीप माने, प्रभाकर कोरवी, सलीम लतीफ, संजय येसादे, सुनील डोंगरे, दिनेश कांबळे, महेश खेडेकर, समीर चाँद, रवींद्र सावंत, नारायण कांबळे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com