आजरा ः टस्कराकडून ट्रॅक्टरचे नुकसान

आजरा ः टस्कराकडून ट्रॅक्टरचे नुकसान

83392, 83394
मसोली (ता. आजरा) ः टस्कराने ट्रॅक्टरचे केलेले नुकसान. दुसऱ्या छायाचित्रात टस्कराने विस्कटलेली भुईमुगाच्या शेंगांची पोती.
...
टस्कराने केले ट्रॅक्टरचे नुकसान
मसोलीतील घटना ः भुईमुगाच्या शेंगांची विस्कटली पोती
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १३ ः भुदरगड तालुक्यातील तांबाळे परिसरात गेलेला टस्कर मसोली परिसरातील चाळोबा जंगलात आला आहे. टस्कराने जंगलात परतल्याबरोबर या परिसरात धुडगूस घालण्यास सुरवात केली आहे. मसोली गावातील तानाजी तेजम यांच्या ट्रॅक्टरचे टस्कराने नुकसान केले. तसेच शेतात रचलेली भुईमुगाच्या शेंगांची पोती व गवताचे भारे विस्कटून टाकले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
आजरा तालुक्यात टस्कराने कायमचा मुक्काम ठोकला आहे. एक तपाहून अधिक काळ तो तालुक्यात ठिय्या मारून आहे. गेला महिनाभर टस्कर या परिसरातून भुदरगड तालुक्यातील तांबाळे परिसरात गेला होता. तेथे त्याने पिकांचे नुकसान केले. तो टस्कर परत चाळोबा जंगलात परतला आहे. त्याने मसोली गावात रस्त्यावर उभ्या केलेल्या तेजम यांच्या ट्रॅक्टरच्या इंजिनला धडक देऊन नुकसान केले. यामध्ये सुमारे पंच्याहत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर शेतात चंद्रकांत गुरव यांनी उन्हाळी भुईमुगाचे पीक घेतले आहे. त्यांनी शेतात भुईमुगाच्या शेंगांची पोती व गवताचे भारे रचून ठेवले होते. ही पोती व भारे टस्कराने विस्कटून टाकले. वनपाल बी. आर. निकम यांनी नुकसानीचा पंचनामा केला आहे.
...
चलाख टस्कर अन् हतबल शेतकरी
शेतातील भुईमुगाची पोती विस्कटल्याचे शेतकरी चंद्रकांत गुरव यांनी वनपाल बी. आर. निकम यांना कळविले. निकम यांनी पुन्हा नुकसान होऊ नये म्हणून भुईमुगाची पोती सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्ला गुरव यांना दिला. गुरव यांनी घरातील परड्यात पोती रचून ठेवली; पण तेथे जाऊन टस्कराने पोती विस्कटली. टस्कराचा चलाखपणा पाहून गुरव हतबल झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com