गडहिंग्लजला हालसिद्धेश्‍वर, 
भागुबाईची गुरूवारी यात्रा

गडहिंग्लजला हालसिद्धेश्‍वर, भागुबाईची गुरूवारी यात्रा

गडहिंग्लजला हालसिद्धेश्‍वर,
भागूबाईची गुरुवारी यात्रा
गडहिंग्लज, ता. १३ ः येथील वडरगे रोडवरील श्री हालसिद्धेश्‍वर व भागूबाई देवीची यात्रा गुरुवारी (ता. १६) होत आहे. सकाळी सातला सुनील मोहिते, विनोद चव्हाण व मारुती मांगले यांच्या हस्ते देवास अभिषेक होईल. आठला महादेवी मोहिते, कांचन मोहिते, मिनाक्षी मोहिते यांच्या हस्ते ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे. सायंकाळी सहाला प्रशांत मोहिते व विठ्ठल मुधोळे यांच्या हस्ते पालखीची पूजा होणार आहे. नारायण मोहिते यांच्या घरातून पालखी मिरवणुकीला प्रारंभ होईल. रात्री आठला पालखी मंदिराजवळ आल्यानंतर शिवाजी मोहिते व भारती मोहिते यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप होणार आहे. विजय मोहिते, सचिन मोहिते, सौरभ मोहिते, गौतम मोहिते, सतीश जगताप, शिवाजी मोहिते, प्रवीण मोहिते, संभाजी मोहिते, विलास मोहिते, शशिकांत मोहिते, राहुल मोहिते, आप्पासाहेब बस्ताडे, कुरणगे यांनी नियोजन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com