कळंबा कारागृहात आणखी एक मोबाईल हॅण्डसेट

कळंबा कारागृहात आणखी एक मोबाईल हॅण्डसेट

कळंबा कारागृहात
पुन्हा सापडला मोबाईल
कोल्हापूर : येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात मोबाईल हॅण्डसेट सापडण्याचे सत्र सुरूच राहिले आहे. आज सकाळी विशेष पथकाने सर्कल सातमध्ये बरॅकच्या झडतीत बॅटरीसह मोबाईल हॅण्डसेट मिळाला. सर्कलच्या मातीच्या ढिगाऱ्यात प्लास्टिक पिशवीत तो लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले. गेल्या वर्षभरात अनेक वेळा मोबाईल हॅण्डसेट, बॅटरी, गांजा यासह इतर वस्तू सापडल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी पुण्यातील विशेष पथकानेही येथे सलग तीन चार दिवस झाडझडती घेतल्यानंतर साफसफाई झाली असे दिसत होते. मात्र, पुन्हा मोबाईल हॅण्डसेट सापडण्याचे सत्र आता सुरू झाले आहे. प्रभारी अधीक्षक विवेक झेंडे यांच्या विशेष पथकाने आता दिवसातून तीन वेळा झाडाझडती घेण्याचे काम सुरू केले आहे. त्यातूनच आज सकाळी सर्कल सातमधील बरॅकची तपासणी केली, तेव्हा ढिगाऱ्याजवळील माती उकरण्यात आली. यावेळी प्लास्टिक पिशवीत गुंडाळलेला बॅटरीसह मोबाईल हॅण्डसेट मिळाला. संबंधितांविरोधात कारवाई करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com