पाणी उपसा दिवसभर बंद

पाणी उपसा 
दिवसभर बंद

पाणी उपसा
दिवसभर बंद
इचलकरंजी, ता. १३ : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्णा आणि पंचगंगा नदीतील पाणी उपसा दिवसभर बंद राहिला. महावितरण कंपनीने देखभाल दुरुस्तीसाठी आज दिवसभर वीज पुरवठा खंडीत ठेवला होता. त्यामुळे आज ४५ एमएलडी पाण्याची तुट निर्माण झाली आहे. परिणामी, शहरातील पुढील दोन दिवस पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. त्यामुळे काही भागात वेळी-अवेळी पाणी पुरवठा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात सतत पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडत आहे. त्यातच आज दिवसभर उपसा केंद्राचा वीज पुरवठा बंद राहिला. सकाळी सात वाजता वीज पुरवठा खंडीत झाला होता. सांयकाळी वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर पुन्हा पाणी उपसा सुरू करण्यात आला असल्याची माहिती शाखा अभियंता बाजीराव कांबळे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com