हॉकी स्टेडियमवरील अपूर्ण कामांना मुहूर्त कधी?

हॉकी स्टेडियमवरील अपूर्ण कामांना मुहूर्त कधी?

83491
कोल्हापूर ः मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवरील अपूर्ण कामे.
....
हॉकी स्टेडियमवरील अपूर्ण कामांना मुहूर्त कधी?

ट्रान्स्फॉर्मरसह गॅलरी, दुकानगाळ्यांचे काम रखडले ः दुरुस्ती देखभाल खर्चाचा पत्ताच नाही

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः लोकसभा निवडणूकांपूर्वी घाईघाईत उद्‍घाटन झालेल्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवरील ॲस्ट्रोटर्फ मैदानावरील अपूर्ण कामांना अद्यापही मुहूर्त मिळालेला आहे. त्यामुळे हॉकीप्रेमींतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गेली कित्येक वर्षे कोल्हापुरातील हॉकीप्रेमींची मागणी असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे ॲस्ट्रोटर्फ मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियवर बसविण्यात आले. मात्र, ते बसविण्यापूर्वी त्यासाठी स्प्रिंकलरद्वारे पाण्याची सोय केलेली नाही. त्यासाठी स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मर अद्याप बसविलेला नाही. याशिवाय दुकानगाळ्यांचे कामही अपूर्ण आहे. यासह प्रेक्षक गॅलरीचे कामही अपूर्ण आहे. खेळाडूंसाठीच्या चेंजिंग रूमचाही पत्ता नाही. ही सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, यासाठी दि डिस्ट्रीक्ट हॉकी असोसिएशनचे पदाधिकारी वारंवार महापालिकेच्या पायऱ्या झिजवत आहेत. मात्र, प्रशासनाकडून त्यांना ठेंगा दाखविला जात आहे.
.......
हे कधी होणार?
- गॅलरी, दुकानगाळ्यांचे काम अपूर्णच
- ॲस्ट्रोटर्फ मैदानासाठी लागणारा विद्युत झोत - सीसीटीव्ही कॅमेरे
- चेंजिंग रूम
- स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मर
- दुरुस्ती देखभालीसाठी अर्थिक तरतूद
- देखभालीसाठी खास प्रशिक्षित कर्मचारी वर्ग
......
कोट....
दीड महिन्यापूर्वी घाईघाईने उद्‍घाटन करण्यास आपला विरोध होता. विरोध डावलून महापालिका प्रशासनाने केवळ ॲस्ट्रोटर्फ बसवून अन्य सुविधांचा विचार न करता अपूर्ण मैदानाचे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्‍घाटन झाले. अनेक कामे अद्यापही रखडलेली आहेत. ती पूर्ण करावीत. दि डिस्ट्रीक्ट हॉकी असोसिएशन व महापालिका यांच्यातील करारानुसार ही सर्व कामे मेजर ध्यानंचंद यांच्या २९ ऑगस्टला होणाऱ्या जयंतीपूर्वी पूर्ण करून हॉकीप्रेमींना महापालिकेने सुखद धक्का द्यावा.
- विजय साळोखे, माजी अध्यक्ष, दि डिस्ट्रीक्ट हॉकी असोसिएशन, कोल्हापूर
..........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com