अवघे शहर शंभूमय...

अवघे शहर शंभूमय...

फोटो 83485
83487
.......
अवघे शहर बनले शंभूमय...
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम; संस्था-संघटनांची जय्यत तयारी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अवघे शहर शंभूमय बनले आहे. उद्या, मंगळवारी होणारा जयंती सोहळा विविध उपक्रमांनी साजरा करण्याची जय्यत तयारी संस्था, संघटनांनी केली आहे. ऐतिहासिक बिंदू चौक, शाहूपुरी परिसरात शंभूराजेंचा भव्य पुतळा उभारून त्या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.
शाहिरी पोवाडा कलामंच कोल्हापूरचे शाहीर समशेर रंगराव पाटील यांच्या शंभूराजे पोवाडा नाट्याचे सादरीकरण आज शाहूपुरी तिसरी गल्लीमध्ये संयुक्त शाहूपुरीतर्फे आयोजित कार्यक्रमात झाले. शंभूराजेंची तेजोमय गाथा यातून लोकांना सांगण्यात आली. त्यात प्रतीक साठे, सागर माने, संग्राम पाटील, पराग निट्टूरकर, सखाराम चौगले, दिव्या टोणपे या कलाकारांचा सहभाग होता. या नाट्याचे लेखन युवराज पाटील, तर दिग्दर्शन युवराज ओतारी यांनी केले. संगीत सलीम फरास यांनी, तर प्रकाश योजना आशिष भागवत यांची होती. रंगभूषा गणेश माने, अंकिता झेंडे, वेशभूषा शिवाजी गुरव, ध्वनी श्रीधर जाधव आणि मनोज खोत यांची होती.
शिवशक्ती प्रतिष्ठानतर्फे छत्रपती संभाजी महाराज स्मारक रुईकर कॉलनी येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जयंतीदिनी त्याठिकाणी अभिवादन केले जाणार आहे. बिंदू चौकात धर्मवीर १४ तर्फे शंभूराजेंचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. पापाची तिकटी येथील शंभूछत्रपती स्मारक येथे विविध संस्था, संघटनांतर्फे अभिवादन केले जाणार आहे. दरम्यान, जिजाऊ ब्रिगेड, सह्याद्री प्रतिष्ठान, मावळा कोल्हापूर, मराठा सेवा संघ, शिवशक्ती प्रतिष्ठान, सह्याद्री इतिहास संशोधन केंद्र, शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच, छत्रपती ब्रिगेड, आनंदराव पवार प्राचीन युद्धकला केंद्र, कोल्हापूर मर्दानी खेळ संस्था, शाहीर परिषद, शिवराज्य विकास मंच, शिवप्रतिष्ठान, आदी संस्था-संघटनांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.

चौकट
मिरवणूक, युद्धकला प्रात्यक्षिके आज
कोल्हापूर मर्दानी खेळ संघटनेतर्फे उद्या, मंगळवारी महाराष्ट्र हायस्कूल येथे मिरवणूक, सकाळी ८ ते १२ यावेळेत रक्तदान शिबिर, सायंकाळी पाच वाजल्यापासून शस्त्रास्त्र प्रदर्शन आणि युद्धकला प्रात्यक्षिकांचे सादरीकरण होणार आहे. रामानंदनगर, जरगनगर, पाचगाव येथे संयुक्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीतर्फे जगरनगर येथील १०० फुटी रोडवर शंभूराजे मूर्तीपूजन सोहळा आणि महापालिकेच्या लक्ष्मीबाई जरग विद्यालयात चित्रकला स्पर्धा होणार आहे.

चौकट
सलग दहा तास लाठीकाठी फिरविणार
संभाजी ब्रिगेडतर्फे मंगळवारी शंभूराजेंना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले जाणार आहे. गिरगाव येथील भैरवनाथ तालमीचे खेळाडू संपत पाटील हे सलग दहा तास दोन्ही हातांनी लाठीकाठी फिरवून अभिवादन करणार आहेत, अशी माहिती रूपेश पाटील यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com