कोल्हापूर एसआयएलसी

कोल्हापूर एसआयएलसी

लोगो घेणे

इन्स्टंट लिक्विड ग्रेव्ही व्यावसायिक कार्यशाळा
कोल्हापूर, ता. १३ : रेडी टु कुक इन्स्टंट खाद्यपदार्थांना सध्याच्या धावपळीच्या युगात खूप महत्त्‍व आले आहे. दैनंदिन गरजेमुळे बाजारपेठेमध्ये या पदार्थांना मागणी असल्याने या क्षेत्रात व्यवसाय सुरू करण्यास संधी आहे. या पार्श्वभूमीवर व्यावसायिक स्वरूपातील एकदिवसीय कार्यशाळा येत्या गुरुवारी (ता. १६) कोल्हापूर येथील सकाळ कार्यालयात आयोजित केली आहे. यामध्ये पंजाबी रेड, हैदराबादी, व्हाईट, फिश करी, महाराष्ट्रीयन, सावजी, साऊथ इंडियन या ग्रेव्ही तसेच इडली-डोसा पीठ, आले-लसूण पेस्ट व कोल्हापुरी तांबडा व पांढरा रस्सा प्रात्यक्षिकासह शिकवले जाणार आहे. तसेच याचा व्यवसाय कसा उभारावा, उपलब्ध बाजारपेठ, पॅकेजिंग, लेबलिंग, कॉस्टिंग, मार्केटिंग, फायनान्स, आदींची माहिती दिली जाणार आहे.
........

शिका उन्हाळी सरबत, मॉकटेलचे विविध प्रकार
चालू उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा यासाठी सरबत व मॉकटेलला मागणी असते. नैसर्गिक फळांपासून व आर्टिफिशियल पद्धतीने विक्रीयोग्य सरबते व विविध प्रकारची नावीन्‍यपूर्ण मॉकटेल तयार करण्यास शिकविणारी कार्यशाळा बुधवारी (ता. १५) कोल्हापूर येथील सकाळ कार्यालयात आयोजित केली आहे. यामध्ये कोकम, आवळा, पाचक, पुदिना, बेलफळ, पेरू, लेमन, कैरी, चिंच, संत्री, लिची, आंबा, गुलाब, अननस, कालाखट्टा, मध, ब्ल्युबेरी इत्यादी सरबते तसेच कोकम आगळ, टिकाऊ कैरी पन्हे, जीरा सिरप ही उत्पादने शिकविली जाणार आहेत. यामध्ये नैसर्गिक फळापासून वर्षभर टिकणारी सरबते व विक्रीयोग्य सिंथेटिक पदार्थ वापरलेली सरबते या दोन्हींचा समावेश आहे. यासोबतच मॉकटेलचे नावीन्यपूर्ण प्रकार व मॉकटेल्स बनवण्याच्या नावीन्यपूर्ण कृती कार्यशाळेत शिकवल्या जातील. या व्यवसायाचे पॅकिंग, कॉस्टिंग, प्रिजर्वेशन, सरबत टिकविण्याची पद्धत, मार्केट, आदी बाबींची माहिती दिली जाणार आहे.

वरील दोन्ही कार्यशाळा सशुल्क असून अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क : ९३५६९७३४२७
ठिकाण : ‘सकाळ’ कार्यालय, शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com