गडहिंग्लजला स्मशान शेडचे रूपडे पालटणार

गडहिंग्लजला स्मशान शेडचे रूपडे पालटणार

gad142.jpg
83574
गडहिंग्लज : नदिवेस परिसरातील स्मशान शेडची दुरुस्ती सुरू असून, दहनासाठी असणारे जुने लोखंडी साठे बदलून नव्याने उभारण्याचे काम सुरू आहे. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्र सेवा)
----------------------------------------
गडहिंग्लजला स्मशान शेडचे रूपडे पालटणार
‘नगरोत्थान’मधून ७० लाख : संरक्षक भिंत, दहा दहन साठ्यांसह रंगकामही होणार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १४ : येथील नदिवेस परिसरातील स्मशान शेड दुरुस्तीचे काम सुरू आहे. यात दहनासाठीचे जुने लोखंडी साठे बदलून नव्याने होणार आहेत. पहिल्या टप्प्यात त्याचे काम सुरू आहे. येथे अंत्यविधीसाठी आलेल्यांना थांबण्यासाठी स्वतंत्र शेडसह संरक्षक भिंत, छपरासाठी नवे पत्रे, रंगकाम आदींचा समावेश आहे. स्मशान शेड जीर्ण झाल्याने दुरुस्ती करण्‍याची नागरिकांची मागणी यानिमित्ताने पूर्ण होणार आहे.
या कामासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नाने नगरोत्थान योजनेतून ७० लाखांचा निधी मिळाला आहे. सुमारे ४५ हजार लोकसंख्या असणाऱ्या गडहिंग्लजला मृतदेह दहन करण्यासाठी नदिवेस परिसरात एकमेव स्मशान शेड आहे. दोन वर्षांपूर्वी कोरोनात तात्पुरती सोय म्हणून हिरण्यकेशी नदीघाटालगत जादाचे शेड उभारले होते. पण, त्याचा वापर आता पूर्णपणे बंद आहे. स्मशानशेडमधील दहनाचे लोखंडी साठे आगीच्या धगीने गंजल्याने खराब झाले होते. एकूण आठ साठे आहेत. स्मशान शेडमधील फरशाही फुटल्या होत्या. छपराचे पत्रेसुद्धा ठिकठिकाणी खराब झाल्याने गळती लागली होती. त्यामुळे येथे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. त्यासाठी स्मशान शेडची दुरुस्ती करावी, अशी नागरिकाची मागणी होती.
स्मशान शेडमधील जुन्या भिडाचे साठे बदलण्याचे काम सुरू आहे. पूर्वीच्या तुलनेत आणखी दोन साठे वाढवून एकूण दहा दहन साठे बसविले जाणार आहेत. आगीच्या झळांनी छपराचे पत्रे लवकर खराब होतात. त्यासाठी सिमेंटचा आरसीसी स्लॅब लोखंडी साठ्यांवर टाकला जाणार आहे. पत्रेही बदलले जाणार असून पडझड झालेली संरक्षक भिंत उभारण्यात येईल. संपूर्ण परिसराची रंगरगोटी होणार आहे. येथे नव्याने पेव्‍हिंग ब्लॉक बसवण्यात येणार आहेत. थेट शेडपर्यंत शववाहिका जाण्यासाठी रॅंप करण्यात येणार आहे. पाण्याच्या टाक्या बसवून अंत्यविधीला येणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र नळ कनेक्शन दिले जाणार असल्याचे नगर अभियंता राजेंद्र गवळी यांनी सांगितले.
----------------
प्रतीक्षेसाठी नवे शेड
अंत्यविधीसाठी मोठ्या संख्येने नागरिक, नातेवाईक, मित्र मंडळी येतात. त्यामुळे अनेकदा सद्याच्या स्मशान शेडमधील जागा अपुरी पडते. परिणामी, उन्हा-पावसात नागरिकांना थांबावे लागते. त्यासाठी अंत्यविधीला येणाऱ्यांना थांबण्यासाठी प्रवेशद्वारालगतच नवे पत्र्याचे शेड उभारले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com