डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील तीन विद्यार्थ्यांची निवड

डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील तीन विद्यार्थ्यांची निवड

ich141.jpg
83604
इचलकरंजी ः ‘डीकेटीई’च्या मेकॅनिकल विभागातील व्होरपार्किंग कंपनीत निवड झालेले विद्यार्थी.

‘डीकेटीई’च्या मेकॅनिकल विभागातील तीन विद्यार्थ्यांची निवड
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १४ ः येथील ‘डीकेटीई’च्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील तीन विद्यार्थ्यांची पुण्यात व्होरपार्किंग सिस्टिम या नामांकित कंपनीत उत्तम पॅकेजवर निवड झाली आहे. अपूर्वा जोलापुरे, उत्कर्ष सरदे व अनुजा पाचोरे हे विद्यार्थी या कंपनीत इंटर्नशिप व प्रीप्लेसमेंटसाठीही ऑफर मिळाली आहे.
‘व्होरपार्किंग’ ही जर्मनीस्थित आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. जगभरातील कार पार्किंग सिस्टिमची आघाडीची निर्माती असून भारतामध्ये या कंपनीचे कार्यालय पुणे येथे आहे. ही कंपनी पार्किंग व्यवस्था डिझाईन व स्थापित करते. या कंपनीने कॉम्बीलिफट, पझल पार्किंग, पार्कसेफ व लेवल पार्किंग सिस्टिम बाजारात आणल्या आहेत. सध्या पार्किंग व्यवस्थेची आवश्‍यकता ओळखून पार्किंगसंदर्भात तंत्रज्ञान, तसेच टेस्टिंग आणि व्यवस्थापन यांसारख्या सेवा पुरवते. अशा या कंपनीत विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यांना संस्थाध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संस्थेच्या प्रभारी संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, उपसंचालक डॉ. यू. जे. पाटील, मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. व्ही. आर. नाईक, टीपीओ जी. एस. जोशी यांचे मार्गदर्शन मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com