आपत्कालीन परिस्थीतीत मुख्यालय सोडू नये

आपत्कालीन परिस्थीतीत मुख्यालय सोडू नये

ich147.jpg
83656
इचलकरंजी : महापालिका उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या उपस्‍थितीत मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला.

आपत्कालीन परिस्थीतीत मुख्यालय सोडू नये
उपायुक्त प्रसाद काटकर : मान्सूनपूर्व तयारीसाठी आढावा बैठक
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १४ : आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही विभाग प्रमुखाने मुख्यालय सोडू नये, अत्यावश्यक कारणाशिवाय कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांना रजा देऊ नयेत. तसेच मोबाईल फोन बंद ठेवू नयेत, असे सक्त आदेश उपायुक्त प्रसाद काटकर यांनी सर्व विभाग प्रमुखांना आज दिले. त्यांच्या उपस्‍थितीत झालेल्या बैठकीत मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला.
यापूर्वीचा महापुराचा पुर्वानुभव लक्षात घेता आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत मान्सुनपूर्व तयारीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार बैठकीत उपायुक्त काटकर यांनी संबंधित विभाग प्रमुखांना आवश्यकतेनुसार आदेश दिले. यामध्ये प्रामुख्याने शहरातील धोकादायक इमारत मालकांना नोटीस देण्याची जबाबदारी उपशहर अभियंता राधिका हावळ यांच्यावर सोपवली. धोकादायक झाडे किंवा त्याच्या फांद्या तोडण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची जबाबदारी उद्यान पर्यवेक्षक सुनील बेलेकर यांच्याकडे दिली आहे.
शहरातील मोठे नाले, ओढा यांचे रुंदीकरण, खोलीकरण तसेच सारण गटारींची स्वच्छता करण्याबाबत आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार आणि स्वच्छता निरीक्षक महादेव मिसाळ यांना सूचना दिल्या. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सर्व साहित्य आणि मशिनरी सुस्थितीत ठेवण्याबाबत अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे आणि संजय कांबळे यांना सांगितले. आवश्यकतेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे आदेश काढण्याचे कामगार अधिकारी विजय राजापुरे यांना सुचित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com