नलवडे, आण्णा इलेव्हनची विजयी सलामी

नलवडे, आण्णा इलेव्हनची विजयी सलामी

83708
कोल्हापूर : छत्रपती शाहू स्टेडियमवर शिवशाहू चाळीस वर्षांवरील वेट्रन फुटबॉल स्पर्धेत पप्पू नलवडे इलेव्हन व अमर अपराध इलेव्हन या दोन संघांत मंगळवारी झालेल्या सामन्यातील क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
................
नलवडे, आण्णा इलेव्हनची विजयी सलामी

शिवशाहू ४० वर्षांवरील वेट्रन फुटबॉल स्पर्धा ः अजित पोवारची हॅटट्रिक

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः शिवाजी स्पोर्टस् फुटबॉल ॲकॅडमीतर्फे आयोजित शिवशाहू ४० वर्षांवरील वेट्रन फुटबॉल स्पर्धेत पप्पू नलवडे इलेव्हनने अमर अपराध इलेव्हनचा, तर आण्णा इलेव्हनने दीपक कुपन्नवार इलेव्हनचा पराभव करीत विजयी सलामी दिली.
छत्रपती शाहू स्टेडियमवर मंगळवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत पहिला सामना पप्पू नलवडे इलेव्हन व अमर अपराध इलेव्हन संघ यांच्यात सामना झाला. सुरुवातीपासूनच नलवडे इलेव्हनकडून आक्रमक व वेगवान चढाया केल्या. यात तिसऱ्याच मिनिटाला योगेश सरनाईकने मिळालेल्या संधीवर गोल करीत संघाला एक विरुद्ध शून्य अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर १७ व्या मिनिटाला अमर सरनाईकने गोल करीत ही आघाडी दोन विरुद्ध गोलशून्य अशी वाढविली. उत्तरार्धात २४ व्या मिनिटास राजेश पाटीलने गोल करीत संघाची आघाडी तीन विरुद्ध गोलशून्य अशी भक्कम केली. अखेरपर्यत हीच गोलसंख्या कायम ठेवत सामना तीन विरुद्ध गोलशून्य अशा फरकाने जिंकत विजयी सलामी दिली.
दुसऱ्या सामन्यात आण्णा इलेव्हनने गडहिंग्लजच्या दीपक कुपन्नवार इलेव्हनचा तीन विरुद्ध गोलशून्य अशा फरकाने पराभव केला. यात १७ व्या, १९ व्या आणि उत्तरार्धात २३ व्या मिनिटाला आण्णा इलेव्हनच्या अजित पोवारने सलग तीन गोलची नोंद करीत हॅटट्रिक साधली. अखेरीस याच गोलसंख्येवर सामना जिंकला
स्पर्धेचे उद्‍घाटन ज्येष्ठ फुटबॉलपटू रघू पिसे, प्रकाश रेडेकर, बाळासाहेब निचिते, संपत जाधव, रमेश देवसकर यांच्या उपस्थितीत झाले. शिवाजी पाटील, उदय पाटील, गजानन कुराडे, किरण साळोखे, रिची फर्नांडिस यांनी स्पर्धेचे संयोजक केले.
.....
चौकट...
आजचे सामने
सकाळी ८ वाजता ः उदय पाटील इलेव्हन विरुद्ध के.एस.व्ही. इलेव्हन
सकाळी ९ वाजता ः गिरीश शहा इलेव्हन विरुद्ध जनार्दन सूर्यवंशी इलेव्हन
दुपारी ४ वाजता ः आण्णा इलेव्हन विरुद्ध के.एस.व्ही. इलेव्हन
सायंकाळी ५ वाजता ः जनार्दन सूर्यवंशी इलेव्हन विरुद्ध पप्पू नलवडे इलेव्हन
...........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com