महावितरणच्या ‘गो ग्रीन’ योजनेत पुणे परिमंडळ आघाडीवर

महावितरणच्या ‘गो ग्रीन’ योजनेत पुणे परिमंडळ आघाडीवर

‘गो ग्रीन’ योजनेत २७ हजार ग्राहक
ःमहावितरणचे कोल्हापूर परिमंडल; वीज बिलाच्या कागदाऐवजी ई-मेल, ‘एसएमएस’चा पर्याय

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १५ : महावितरणच्या गो-ग्रीन योजनेंतर्गत वीज बिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील १ लाख ८४ हजार २२० वीजग्राहकांनी केवळ ''ई-मेल'' व ''एसएमएस''चा पर्याय निवडला आहे. यामुळे त्यांची तब्बल दोन कोटी २१ लाख रुपयांची वार्षिक बचत झाली आहे. तर या योजनेत पुणे परिमंडलातील एक लाख २३ हजार वीजग्राहकांनी राज्यात सर्वाधिक संख्येने सहभाग घेतला आहे. यामध्ये कोल्हापूर परिमंडलातील २७ हजार ७९ ग्राहकांचा समावेश आहे.
या योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ''ई-मेल'' व ''एसएमएस''चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वार्षिक १२० रुपयांची वीज बिलांमध्ये बचत होत आहे. वीज बिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते ''गो-ग्रीन''मधील ग्राहकांना ''ई-मेल''द्वारे पाठविण्यात येत आहे. सोबतच ''एसएमएस''द्वारे देखील वीज बिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटचा त्वरित लाभ घेणे आणखी शक्य झाले आहे. दिवसेंदिवस पर्यावरणात प्रतिकूल बदल होत आहे. त्यामुळे पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी ‘गो-ग्रीन’ योजना ही काळाची गरज झाली आहे. वीज बिलाची सॉफ्ट कॉपी जतन करून ज्यावेळी आवश्यकता असेल तेव्हा वीज बिलाची कागदी प्रिंट काढता येते. त्यामुळे कागदी मासिक बिलाचा वापर बंद करून गो-ग्रीन योजनेत वीज ग्राहकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.
....

जिल्ह्यातील १६ हजार ६१५ ग्राहक
पुणे परिमंडलातील १ लाख २३ हजार ४०३ वीज ग्राहकांकडून १ कोटी ४८ लाख ८ हजार ३६० रुपयांची वार्षिक बचत झाली आहे. यामध्ये कोल्हापूर परिमंडलातील २७ हजार ७९ ग्राहक ३२ लाख ४९ हजार ४८० रुपयांची बचत करीत आहेत. यात कोल्हापूर जिल्ह्यातील १६ हजार ६१५ आणि सांगली जिल्ह्यातील १० हजार ४६४ ग्राहकांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com