वाहतूक कोंडीमुळे प्रवाशी, पर्यटक त्रस्त

वाहतूक कोंडीमुळे प्रवाशी, पर्यटक त्रस्त

ajr142.jpg.....
83628
आजरा : येथील आजरा बसस्थानकावर आजरा-आंबोली मार्गावर झालेली वाहतूक कोंडी.
-------------------------
वाहतूक कोंडीमुळे प्रवासी, पर्यटक त्रस्त
आजऱ्यात महामार्गचे काम : वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविणे गरजेचे
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १५ : शहरात वाहतूक कोडींचे प्रमाण वाढले आहे. संकेश्वर-बांदा महामार्गाचे काम सुरू असल्याने संभाजी चौक व आजरा बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. काल (ता. १४) दुपारी बसस्थानक परिसरात कोंडी होऊन वाहतूक सुमारे पाऊण तास ठप्प होती. प्रवासी व पर्यटकांना त्रासाला सामोरे जावे लागले. त्यांच्यातून संताप व्यक्त होत होता.
संकेश्वर-बांदा रस्त्याचे काम शहरात कुर्म गतीने सुरू आहे. हे काम गतीने व्हावे यासाठी शिवसेना उध्दव ठाकरे गटाने शहरात रास्ता रोको केला होता. त्याचबरोबर अन्याय निवारण समितीनेही काम तातडीने व्हावे यासाठी निवेदन दिले होते. रस्त्याचे काम सुरू झाले आहे. पूर्वी महामार्गाच्या कामासाठी रस्ते खुदाई केल्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. आता रस्त्याचे काम सुरू झाल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण वाढले आहे. काल दुपारी बसस्थानकापासून भाई-भाई चित्रपटगृह तर दुसऱ्या बाजूला मार्निंग स्टार हॉटेलपर्यंत दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एका बाजूला तयार होणाऱ्या रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने कशीही लावल्यामुळे वाहनांना बाजू देताना अडचण येत होती. रस्ता तयार होईपर्यंत या मार्गावरील वाहने दुसऱ्या मार्गावरून वळविणे गरजेचे आहे. येथे काही दिवस एकेरी वाहतूक करण्याची गरज आहे. अन्यथा, रस्ता तयार होईपर्यंत वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागेल, असे जाणकार व वाहनधारकांचे म्हणणे आहे.
-------------
व्यवसायावर परिणाम
या मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे सातत्याने वाहतूक ठप्प होत असल्याने दुकानदारांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. रस्त्याच्या बांधकामामुळे सुमारे वर्षभर व्यवसायाला फटका बसला असताना यात वाहतूक कोंडीमुळे भर पडल्याचे व्यावसायिकांनी सांगीतले.
----------
... अन गावाला वळसा!
वाहतूक कोंडीचा अनुभव वाहनधारकांना आल्याने अनेकांनी आजऱ्याच्या बाहेरून सुतार गल्ली, गांधीनगर मार्गे आंबोलीचा रस्ता धरला. बाजारपेठेत व महागाव रस्त्यावर वाहने मोठ्या प्रमाणात आल्यामुळे वाहनांची गर्दी झाली होती. अनेकांना गावाला वळसा घालून जावे लागले.
--------------
महामार्गाचे काम सुरू आहे. नगरपंचायतीने रस्ता खुदाई अनेक ठिकाणी केली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्याचे काम गतीने होण्याची गरज आहे. काम पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडी संपेल.
- नागेश यमगर, सहायक पोलिस निरीक्षक, आजरा पोलिस ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com