होर्डिंग्ज असो. बैठक

होर्डिंग्ज असो. बैठक

दुर्घटनेमुळे शहरातील ६९१ होर्डिंग्ज चर्चेत
बेकायदेशीरवर कारवाईची गरज ; होर्डिंग्ज असोसिएशनच्या बैठकीत प्रशासनाची सूचना

कोल्हापूर, ता. १४ : मुंबईतील दुर्घटनेमुळे महापालिकेचा परवाना असलेली शहरातील गर्दीच्या ठिकाणी, चौकात असलेली ६९१ होर्डिंग्ज चर्चेत आली आहेत. त्यातील ६६ महापालिकेच्या जागेत असून, इतर सर्व खासगी जागेत आहेत. त्यांची वेळीच तपासणी झाल्यास धोका टाळणे शक्य होणार आहे. तसेच बेकायदेशीर होर्डिंग्जवर कारवाई होण्याची गरज आहे. महापालिकेने आज बैठक घेऊन काही दुर्घटना झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित होर्डिंग्जधारकावर टाकल्याने होर्डिंग्जधारकांनीही दक्षता घेण्याची आवश्‍यकता आहे.
शहरांतर्गत लावण्यात आलेल्या होर्डिंग्जच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने बैठक घेतली. त्यात होर्डिंग्ज असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्यांसमवेत अधिकारी उपस्थित होते. त्यात होर्डिंग्जचे तसेच इमारतीचे स्थिरता प्रमाणपत्र घेण्याच्या सूचना केल्या आहेत. अध्यक्षस्थानी उपायुक्त साधना पाटील होत्या.
दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व होर्डिंग्जची चर्चा जोरात सुरू झाली. महापालिकेच्या इस्टेट विभागाकडून त्यांची परवानगी घेतली जाते. त्यानुसार ६९१ होर्डिंग्जना परवाना दिल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. त्यातील ६२५ होर्डिंग्ज खासगी जागेत आहेत. ती लावताना विविध निकष पूर्ण करावे लागतात. त्यासाठी तपासणी करून वेळीच खबरदारी घेण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. तसेच बेकायदेशीरवर कारवाईही आवश्‍यक आहे. चार होर्डिंग्ज बेकायदेशीर असून, त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे समजते.
महापालिकेने घेतलेल्या बैठकीत अधिकृत होर्डिंग्जचे तसेच जुन्या इमारतीवर ते लावले असल्यास त्या इमारतीचे स्थिरता प्रमाणपत्र आवश्‍यक असल्याचे सांगितले. होर्डिंग्जसाठी संबंधित मिळकतधारकांचे संमतीपत्र आवश्‍यक आहे. अधिकृत होर्डिंग्जचा परवाना क्रमांक, क्युआर कोड व शासनाने निर्देशीत केल्याप्रमाणे माहिती फलक तात्काळ लावल्या जाव्यात अशा सूचनाही बैठकीत दिल्या. यानंतरही शहरामध्ये अशी दुर्घटना होऊन जीवीत, वित्तहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित होर्डिंग्जधारकांची असेल अशा सूचनाही असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांना देण्यात आल्या. यावेळी होर्डिंग्ज असोसिएशनचे अध्यक्ष अमित सांगावकर, सदस्य, संदीप खामितकर, सर्जेराव पाटील, ज्ञानदेव पाटील , सुहास सांगवडेकर, माणिक ठाकूर , मानस मंडलिक आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com