मोफत पुस्तके

मोफत पुस्तके

४४ हजार विद्यार्थ्यांना
मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

कोल्हापूर, ता. १४ : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीकडून समग्र शिक्षा अभियानांतर्गत १९३ शाळांतील सुमारे ४४ हजार विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण शाळेच्या पहिल्याच दिवशी करण्यात येणार आहे. यासाठी बालभारतीकडून पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत.
इयत्तानिहाय, माध्यमिकनिहाय व विविध विषयनिहाय मोफत पाठ्यपुस्तके बालभारती येथून आणली आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, प्राथमिक शिक्षण समितीकडील कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील, विषय साधनव्यक्ती श्रावण कोकोतकर, व्यवस्थापक किशोर पाटील यांच्या उपस्थितीत पुस्तके वितरणाचा प्रारंभ झाला.
शहरातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी समग्र शिक्षा अभियान राबवित आहे. नवीन शैक्षणिक वर्षात नवीन पुस्तके, नवीन संकल्पना घेऊन शाळेच्या पहिल्याच दिवशी बुक डे साजरा करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com