खेडूत संस्था निकाल

खेडूत संस्था निकाल

खेडूत शिक्षण संस्थेच्या
निवडणुकीचा मार्ग मोकळा
१९९९ नंतरचे सभासदही पात्र : घटनादुरुस्तीचा आदेश रद्द
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १६ : खेडूत शिक्षण संस्थेचे १९९९ नंतरचे सर्व सभासद निवडणुकीस पात्र आहेत, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिल्यामुळे संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. संस्थेच्या विद्या बांदिवडेकर यांनी ही माहिती दिली.
संस्थेच्या विश्वस्थ मंडळात दोन गट पडून एका गटाने १९९९ नंतरचे सभासद रद्द करावेत. तसेच घटनादुरुस्तीला मान्यता द्यावी, अशी मागणी धर्मादाय आयुक्तांकडे केली होती. त्याला धर्मादाय आयुक्तांनी मान्यता दिली होती. या निर्णयावर विद्या बांदिवडेकर यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्याचा निकाल नुकताच लागला. उच्च न्यायालयाने धर्मादाय आयुक्तांचा निर्णय रद्द ठरवताना १९९९ नंतरचे सर्व सभासद मतदानास पात्र आहेत, असा निर्वाळा दिला. घटनादुरुस्तीचा आदेशही न्यायालयाने रद्द ठरवल्याचे बांदिवडेकर यांनी सांगितले. या निकालामुळे सात वर्षांच्या न्यायालयीन संघर्षात संस्थेच्या हितचिंतक गटाचा विजय ठरल्याचे बांदिवेडकर यांनी स्पष्ट केले.
विरोधी गटाचे प्रा. आर. पी. पाटील, एम. एन. तुपारे यांच्याशी संपर्क केला असता संस्थेच्या निवडणुकीच्या मुद्याला आपणही मान्यता दिल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाने निवडणुकीसाठी कच्ची, पक्की मतदारयादी तयार करणे, पात्र उमेदवार ठरवण्याचा अधिकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत. शिवाय घटनादुरुस्ती आवश्यक असल्यास त्यालाही संस्थेला अधिकार दिले असल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com