रस्ते पत्रक

रस्ते पत्रक

पालकमंत्री तुम्ही कोल्हापूरवासीयांना
फसवलत, माफी मागा : पवार

१०० कोटी रस्ते कामाचा प्रारंभ गडबडीत का?

कोल्हापूर, ता. १४ : महापालिकेची उपाययोजनाच नव्हती तर गडबडीत कामाचा प्रारंभ कशासाठी व कोणला खूश करण्यासाठी केला? तुम्ही कोल्हापूरवासीयांना फसवले असून, माफी मागा अन्यथा प्रशासन व सरकारविरोधात लवकरच हल्लाबोल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
पत्रकात म्हटले आहे की, शासनाने जनतेच्या करातून मिळणाऱ्या निधीतून शहरातील रस्ते दर्जेदार व्हावेत म्हणून १०० कोटी दिले. वादग्रस्त निविदा प्रक्रिया कशीबशी पार पाडून नियम धाब्यावर बसवून ठेकेदार निश्चित केला. पालकमंत्र्यांनी मोठा गाजावाजा करीत १०० कोटींच्या रस्त्यांच्या कामाचा प्रारंभ केला. पण, आजतागायत कोल्हापूरकरांचा खड्ड्यातून प्रवासाचा वनवास संपलेला नाही. त्याला नियोजनशून्य व निष्क्रिय महापालिका प्रशासनाबरोबरच पालकमंत्रीही जबाबदार आहेत. पालकमंत्र्यांनी रस्ते कामाचा प्रारंभ करण्याचा अट्टाहास कोणासाठी व कशासाठी केला? रस्ते करण्यापूर्वीची महापालिकेची उपाययोजना तयार नव्हती तर मग गडबडीत प्रारंभ कशासाठी व कोणाला खुश करण्यासाठी केला? भविष्यात आपले सरकार पडेल आणि ठेकेदाराकडून मानसन्मान मिळणार नाही, या भीतीपोटी आपण प्रारंभ केला का? शिवसेनेच्या वतीने या बाबींबाबत लवकरच हल्लाबोल आंदोलन करण्यात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com