जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी मदन पाटील

जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी मदन पाटील

83723
83724
83725
...
जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या
अध्यक्षपदी मदन पाटील बिनविरोध

उपाध्यक्षपदी किरण जाधव, संदीप मिसाळ; स्वीकृत संचालकपदी तिघांना संधी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ : येथील कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी मदन पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी किरण जाधव, संदीप मिसाळ यांची आज बिनविरोध निवड झाली. स्वीकृत संचालकपदी काम करण्याची शशिकांत खोत, रवी पाटील, प्रशांत माळी यांना संचालक मंडळाने संधी दिली आहे.
या असोसिएशनची पंचवार्षिक निवडणूक (सन २०२४-२०२९) बिनविरोध झाली. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी जेवढ्या जागा आहेत तेवढेच अर्ज शिल्लक राहिल्यामुळे ३९ जणांची निवड बिनविरोध झाली. त्यानंतर पदाधिकारी निवडीची बैठक आज झाली. अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. रवी शिराळकर होते. या बैठकीत सचिवपदी प्रल्हाद खवरे, सहसचिवपदी मोहन ढेरे, खजानिसपदी दाजिबा पाटील आणि संघटक सचिवपदी सचिन पाटील यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष, सचिव वगळता अन्य पदांवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यावेळी संचालक संजय शेटे, महेश सावंत, शिवाजी ढेंगे, सुरेश काटकर, आदी उपस्थित होते.
नूतन अध्यक्ष मदन पाटील हे गेल्या बारा वर्षांपासून महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनच्या संघटन सचिवपदी कार्यरत आहेत. त्यांनी जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची सन २००२ ते २०१९ आणि सन २०२३-२४ दरम्यान जबाबदारी सांभाळली आहे.
.....

असोसिएशनच्या सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणार आहे. सभासदांचे प्रलंबित प्रश्न सोडविणार आहे. जिल्ह्यात ब्रँडेड फार्मसी स्टोअर्स करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- मदन पाटील, नूतन अध्यक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com