लाचप्रकरणी पसार एक्साईज अधिकारी संजय पाटील अटकेत

लाचप्रकरणी पसार एक्साईज अधिकारी संजय पाटील अटकेत

83739
संजय पाटील
...

‘उत्पादन शुल्क’चा अधीक्षक
संजय पाटील याला पाचगणीत अटक
चंद्रपूर येथील लाच घेतल्याचे प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ : बीअर बारच्‍या परवान्यासाठी एक लाखाच्या लाचप्रकरणातील पसार झालेले उत्पादन शुल्कचे पोलिस अधीक्षक संजयकुमार जयसिंगराव पाटील (मूळ रा. आर. के. नगर) यांना मंगळवारी पहाटे पाचगणी तालुक्यातील भिलार गावातील रिसॉर्टवरून ताब्यात घेतेले. चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
घुग्घूस (जि. चंद्रपूर) येथे नवीन बीअर शॉपीच्‍या परवान्यासाठी दाखल अर्जात टाळाटाळ करीत तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. यातील एक लाख रुपयांची लाच दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे याने मागितली. रक्कम स्वीकारताना अभय खताळ याला पकडण्यात आले. ही रक्कम चंद्रपूर उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्यासाठी मागितल्याचे समोर आल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संजय पाटील पसार झाले होते.
संजय पाटील ७ मे रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरदवाड येथे मतदानासाठी आले होते; पण गुन्हा दाखल झाल्याचे समजताच ते पसार झाले होते. चंद्रपूर पोलिस त्यांच्या मागावर होते. ते पाचगणीतील रिसॉर्टवर असल्याची माहिती मिळताच मध्यरात्री दीडच्या सुमारास छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. या पथकामध्ये पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील, अंमलदार वैभव गाडगे, अमोल सिडाम यांच्या समावेश होता. पुढील कार्यवाहीसाठी त्याना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथे हजर करण्यात आले. त्याना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com