मंगळवार पेठ मुख्य रस्त्यावर 
तब्बल बारा वर्षानंतर डांबर

मंगळवार पेठ मुख्य रस्त्यावर तब्बल बारा वर्षानंतर डांबर

83851
कोल्हापूर : मंगळवार पेठेतील कोळेकर तिकटीपासूनच्या रस्त्याचे डांबरीकरण गतीने सुरू आहे.

मंगळवार पेठ मुख्य रस्त्यावर
तब्बल बारा वर्षांनंतर डांबर!
कोळेकर तिकटीपासून कामाला प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ : प्रचंड वर्दळीच्या असणाऱ्या तसेच वारंवार आंदोलन झालेल्या मंगळवार पेठेतील मुख्य रस्त्यावर जवळपास बारा वर्षांनंतर डांबर पडले आहे. कोळेकर तिकटीपासून रस्त्याचे डांबरीकरण सुरू केले असून, लवकरच नंगीवली चौकापर्यंतचे काम पूर्ण केले जाणार आहे.
मंगळवार पेठेतील मुख्य रस्त्यावरून मोठी वर्दळ आहे. या रस्त्याचे पूर्ण डांबरीकरणाचे काम बारा वर्षांत झालेले नाही. गेल्या दोन वर्षांपासून येथील पाईपलाईनचे काम होणार असल्याने किरकोळ पॅचवर्क तसेच मुरुमाचे पॅचवर्क केले जात होते. पाईपलाईनचे काम झाल्यानंतर १०० कोटींच्या निधीतून रस्ता केला जाणार असल्याचे सांगत पॅचवर्क थांबवले गेले. परिणामी, या रस्त्यावरून जाताना वाहनधारकांचे प्रचंड हाल होत होते. शिवाय स्थानिक नागरिकांना धुळीचा त्रास होत होता. १०० कोटींचे रस्ते कामाचे उद्‍घाटन या रस्त्यावरच करण्यात येऊनही चार महिन्यांपासून काम सुरू झाले नव्हते. यामुळे नागरिकांनी निवेदने दिली, आंदोलने केली होती. १५ मेपर्यंत पाच रस्ते करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतरही टोलवाटोलवी होत असल्याने नागरिकांनी ठेकेदाराच्या कार्यालयातच ठिय्या मारला.
त्यानंतर मंगळवार पेठेतील कामाला वेग आला. नंगीवली तालीम ते कोळेकर तिकटी या टप्प्यात तातडीने खडी पसरण्यात आली. त्यानंतर आजपासून डांबरीकरणाला सुरुवात केली आहे. कोळेकर तिकटीपासून एका बाजूचे डांबरीकरण करण्यात आले असून, दुसऱ्या बाजूचे डांबरीकरण तेथील पाईपलाईनचे काम झाल्यानंतर केले जाणार आहे. त्याचवेळी कोळेकर तिकटी ते मिरजकर तिकटीचे काम करण्याचे नियोजन आहे.
-----------------
चौकट
निर्मिती कॉर्नर ते कारागृह रस्ता पूर्ण
निर्मिती कॉर्नर ते कळंबा कारागृह या ५९८ मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. त्यानंतर उद्या (ता. १६) खरी कॉर्नर ते उभा मारुती चौकापर्यंतच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. मंगळवार पेठ, निर्मिती कॉर्नर, उभा मारुती चौक या रस्त्यांचे डांबरीकरण झाल्यानंतर यादवनगर रस्ता एकाचवेळी केला जाणार आहे. दसरा चौक ते इंदिरा सागर हॉटेल २९०५ मीटरपैकी मंगळवार पेठेतील काम सुरू आहे. माऊली चौक ते हुतात्मा चौक ते विश्‍वजित हॉटेल या १५०० मीटर रस्त्याच्या युटीलिटी शिफ्टींग तसेच खडीकरणचे काम सुरू आहे. पाच रस्त्यांचे ३० मे पूर्वी खडीकरण व डांबरीकरण पूर्ण करण्याचे आदेश ठेकेदारांना दिले आहेत. कामाची मुदत १८ महिन्यांची असून १३ मे २०२५ रोजी पूर्ण होणार आहे. १६ रस्त्यांची कामे पूर्ण करणे ठेकेदाराला बंधनकारक राहणार आहे. अन्यथा शर्तीनुसार कारवाई करणेत येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com