महाकाली नवचंडी यज्ञ उत्साहात

महाकाली नवचंडी यज्ञ उत्साहात

83833

किंवा KOP24M83861
कोल्हापूर : नवचंडी यज्ञाच्या निमित्ताने बुधवारी महाकालीची खडी पूजा बांधण्यात आली होती.

श्री महाकाली मंदिरात
नवचंडी यज्ञ उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ : शिवाजी पेठेतील श्री महाकाली देवीच्या उत्सवात आज नवचंडी यज्ञ करण्यात आला. यानंतर झालेल्या महाप्रसादाचा लाभ सुमारे दहा हजार भाविकांनी घेतला. नवचंडी यज्ञानिमित्त देवीची खडीपूजा बांधण्यात आली होती. शुक्रवारी (ता. १७) देवीची नगरप्रदक्षिणा होणार आहे.
अक्षयतृतीयेपासून महाकाली देवीचा उत्सव सुरू आहे. बुधवारी सकाळी देवीला महाभिषेक करण्यात आला. यानंतर उपेंद्र चव्हाण दांपत्याच्या हस्ते नवचंडी यज्ञाला सुरुवात झाली. दुपारी १२ वाजता देवीची आरती होऊन महाप्रसाद वाटपाला सुरुवात झाली. यावेळी माजी आमदार चंद्रदीप नरके, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, महालक्ष्मी ट्रस्टचे राजू मेवेकरी, ऋतुराज क्षीरसागर, अमर नकाते, करण शिंदे यांच्‍या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. देवीची पूजा गजानन गुरव, जयदीप गुरव, अक्षय गुरव, आदित्य गुरव, रूपाली गुरव, स्वाती गुरव, भारती गुरव यांनी बांधली होती. शुक्रवारी देवीची नगरप्रदक्षिणा होणार आहे. महाकाली तालीम मंडळातर्फे सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com