नैसर्गिक मधमाशांची पोळी झाली दुर्मिळ

नैसर्गिक मधमाशांची पोळी झाली दुर्मिळ

chd154.jpg
83835
चंदगड ः फुलातून मध शोषताना मधमाशी.
---------------------
नैसर्गिक मधमाश्‍यांची पोळी झाली दुर्मीळ
व्यवसायही अडचणीत ः शास्त्रज्ञांनी अभ्यास करण्याची आवश्‍यकता
सुनील कोंडुसकर ः सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १५ ः सह्याद्री घाटरांगेला संलग्न असलेल्या चंदगड तालुक्यात नैसर्गिक मधमाश्‍यांची पोळी दुर्मीळ झाली आहेत. पूर्वी शेतातील झाडांवर, जंगलात सहजपणाने आढळणारी ही पोळी आता शोधण्याची वेळ आली आहे. मधमाशीपालन व्यवसायही कमी झाला आहे. यासंदर्भात शास्त्रीय अभ्यास करून उपाययोजनांची गरज आहे.
चंदगड, आजरा, भुदरगड, राधानगरी तालुक्यांचा पश्चिम भाग हा कोकणाला संलग्न आहे. विविध प्रकारचे वृक्ष, वेली, फुलझाडे यामुळे मधमाश्‍यांची संख्या जास्त होती. जानेवारीपासून आंबा, बेहडा, हिरडा, जांभूळ, हुंबर यासारख्या देशी वाणांच्या झाडांना फुलोरा यायचा. मधमाश्‍या त्यातील मध वेचून पोळी साकारायच्या. स्थानिक नागरिक एप्रिल, मे महिन्यांच्या दरम्यान भरलेली पोळी शोधून त्यातून मध संकलन करायची. नंतरच्या काळात शास्त्रीय पध्दतीने मध संकलन करण्याची संकल्पना विकसित झाली. त्यावेळी गवसे (ता. आजरा) येथे मध संचलनालय केंद्र होते. तेथून दरवर्षी सुमारे पाच ते दहा टन मध महाबळेश्वर येथील मध संचलनालय केंद्राला पाठवला जायचा. त्यातून शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मिळायचे, मात्र काही वर्षांत नैसर्गिक मधमाश्‍यांची पोळी दुर्मीळ झाली. त्याच पध्दतीने मधमाशीपालन व्यवसायही अडचणीत आला आहे. शेतातील देशी वाणांच्या झाडांची मोठ्या प्रमाणात झालेली तोड, पिकांवर केली जाणारी रासायनिक फवारणी, जागतिक तापमानवाढ यासारखी अनेक कारणे सांगितली जातात, मात्र त्यावर मात करून हा व्यवसाय पुन्हा नव्याने कसा उभारायचा याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष आहे. यासाठी शास्त्रज्ञांच्या टीमने या विभागाचा अभ्यास करायला हवा. येथे तळ ठोकून कारणे शोधायला हवीत. त्यातून त्यांनी पर्याय दिल्यास या विभागातून मध उत्पादनाला मोठा वाव आहे. अलीकडच्या काळात नैसर्गिक पदार्थ खरेदीला जगभरातून मिळणारा प्रतिसाद पाहता शेतकऱ्यांना त्यातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवणे शक्य आहे.
--------------
दहा वर्षांहून अधिक काळ मधमाशीपालन केले, परंतु अलीकडच्या काळात मधमाश्‍यांकडून अपेक्षित मध संकलन होत नाही. यासंदर्भात शासनाने पुढाकार घेऊन शास्त्रज्ञांकरवी अभ्यास करायला हवा. शेतीला जोड व्यवसाय म्हणून तो अत्यंत फायदेशीर आहे.
- दशरथ घुरे, जेऊर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com