आजऱ्यात नाले सफाईची प्रतीक्षाच

आजऱ्यात नाले सफाईची प्रतीक्षाच

ajr152.jpg.....
83918
आजरा ः शहरातून जाणाऱ्या लेंडओहळमध्ये झुडपे व वेलींचे साम्राज्य पसरलेले आहे. (छायाचित्र : श्रीकांत देसाई, आजरा)
-------------------------
आजऱ्यात नाले सफाईची प्रतीक्षाच
पावसाळा तोंडावर ः लेंडओहळमध्ये झुडपे-वेलींचे साम्राज्य, गटारीत प्लास्टिकचा खच
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १६ ः पावसाळा काही दिवसांवर आला आहे; पण शहरातील गटारी व नाल्यांची सफाई अजून झालेली नाही. शहरातून जाणाऱ्या लेंडओहळमध्ये झुडपे, वेलींचे साम्राज्य पसरलेले आहे. गटारीमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्यांचा खच पडला आहे. वळीव पडल्यावर गटारीतून पाणी रस्त्यावर आले. लेंडओहळमधून पाणी तुंबले. त्यामुळे संभाजी चौक परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे शहरातील लेंडओहळ या नाल्यासह गटारींची सफाई कधी होणार अशी विचारणा शहरातील नागरिक करीत आहेत.
आजरा तालुक्यात पावसाळ्यात धुवाँधार पाऊस कोसळतो. त्यामुळे पाणी वाहण्यासाठी गटारी व नाले स्वच्छ असले पाहिजेत. यामध्ये अडथळे आल्यास पाणी रस्त्यावर येते. दलदल व चिखल तयार होतो. डासांचा फैलाव होतो. आरोग्याची समस्या तयार होते. शहरातील गटारी व नाल्यांची सफाई अजूनही झालेली नाही. शहरातून जाणाऱ्या लेंडओहळमध्ये झाडे, झुडपे वाढलेली आहेत. त्याचबरोबर लेंडओहळमध्ये कचरा टाकल्यामुळे पाणी जाण्यासाठी अडचण तयार झालेली आहे. शहरात गटारांमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्यांचा खच साठला आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे पाणी रस्त्यावर आले. संभाजी चौकाला तर तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. बसस्थानक परिसरातही पाणीच-पाणी झाले होते. वाहनधारक व पादचाऱ्यांना पाण्यातून मार्ग काढावा लागला. ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांचे हाल झाले. संभाजी चौकातील गटारीला होल पाडून पाण्याचा निचरा करावा लागला. हा अनुभव आजरेकरांना सध्या आलेला आहे. त्यामुळे शहरातील गटारी व नाल्यांची सफाई होणे गरजेचे आहे. पावसाळा तोंडावर आला असूनही कामांना सुरुवात झालेली नाही. नाले सफाई कधी करणार अशी विचारणा नागरिक करीत आहेत.
--------------
आजरा शहरातील गटारींच्या स्वच्छतेचे काम सुरू आहे. उपनगरातील काही गटारींची स्वच्छता केली गेली आहे. लेंडओहळची स्वच्छता केलेली नाही. लवकरच मुख्य मार्गावरील गटारी व नाल्यांची स्वच्छता केली जाईल.
-राकेश चौगुले, प्रशासकीय अधिकारी, आजरा नगरपंचायत आजरा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com