हाळलक्ष्मी दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

हाळलक्ष्मी दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

gad153.jpg
83894
गडहिंग्लज : वडरगे रोडवरील श्री हाळलक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त मूर्तीची आकर्षक पूजा बांधली होती. दर्शनासाठी महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
----------------------------------------------------
हाळलक्ष्मी दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी
गडहिंग्लजची ग्रामदेवी : धार्मिक कार्यक्रमांसह स्पर्धा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १५ : शहरापासून दोन किलोमीटरवर असलेल्या वडरगे रोडवरील श्री हाळलक्ष्मी देवीची यात्रा उत्साहात झाली. देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची मांदियाळी जमली होती. विविध धार्मिक कार्यक्रमांसह स्पर्धा, शर्यतींना प्रतिसाद मिळाला.
अक्षय तृतीयेनंतरच्या पहिल्या मंगळवारी या देवीची यात्रा होते. देवस्थान ट्रस्ट व गणेश मंडळातर्फे यात्रेचे संयोजन केले होते. मंदिराला आकर्षक रोषणाई केली होती. सोमवारी देवीची पालखी मिरवणुकीने पारंपरिक थाटात मंदिरात दाखल झाली. सायंकाळी पाचच्या सुमारास खातेदार सुधीर पाटील यांच्या वाड्यातून पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला. वाद्यांच्या गजरात व भाविकांच्या सहभागाने निघालेली ही मिरवणूक शिवाजी चौकापासून नेहरू चौक, बाजारपेठ, काळभैरी रोड, वडरगे रोडमार्गे मंदिरात पोहोचली. यावेळी यात्रा समितीचे पदाधिकारी, भाविक व सेवेकरी सहभागी झाले होते. हाळलक्ष्मीच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात ही मिरवणूक निघाली.
देवीची मुख्य यात्रा उत्साहात झाली. पहाटे अभिषेक झाला. सेवेकरी कुंभार समाजातर्फे देवीची आकर्षक पूजा बांधली. दुपारी पनोरे समाजाचा मानाचा नैवेद्य दाखवल्यानंतर आरती झाली. त्यानंतर महाप्रसादाला प्रारंभ केला. या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. यात्रेच्या निमित्ताने खेळणी व खाद्यपदार्थांची दुकाने सजली होती. सायंकाळी वडरगेतील गोसावीनाथांच्या पालखीच्या गळाभेटीनंतर पालख्या मंदिरात विराजमान झाल्या. त्यानंतर यात्रेची सांगता झाली. यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतींना प्रतिसाद मिळाला. सायंकाळी दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी होती. मोठी दर्शन रांग लागली होती. त्यात महिला भाविकांचा समावेश अधिक होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com