‘बैंडी फेडरेशन कप’वर महाराष्ट्राचे नाव

‘बैंडी फेडरेशन कप’वर महाराष्ट्राचे नाव

लोगो ः बैंडी फेडरेशन कप हॉकी स्पर्धा
...................
‘बैंडी फेडरेशन कप’वर महाराष्ट्राचे नाव

मुलींच्या संघाला सुवर्ण, तर मुलांना रौप्य ः दहा राज्यांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ ः गोव्यात झालेल्या बैंडी फेडरेशन कप हॉकी स्पर्धेत १९ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने हरियाणा संघाला एक विरुद्ध शून्य गोलने हरवून सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर मुलांमध्ये महाराष्ट्र संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दोन्ही संघांमध्ये कोल्हापूरच्या मुला-मुलींचा सर्वाधिक सहभाग होता.
गोवा येथे झालेल्या या स्पर्धेत देशभरातील दहा संघांनी सहभाग घेतला होता. त्यात महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींनी गतविजेत्या हरियाणा संघाचा एक विरुद्ध गोलशून्यने पराभव करीत विजेतेपद पटकावले, तर मुलांमध्ये महाराष्ट्राच्या संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. १२ वर्षांखालील गटातही महाराष्ट्राच्या मुलांनी तिसरा क्रमांक पटकावत कांस्यपदक मिळवले. १९ वर्षांखालील मुलींमध्ये विजया पाटील, जिया स्वामी, निवेदिता शिंदे, मंतशा मुजावर, तर मुलांमध्ये राहुल खैरे, कृष्णा नेतले, मोहन सावंत, संकल्प पाटील, पार्थ हिरुगडे, पुष्पक चौगुले, सुमेध सरनोबत, तर १२ वर्षांखालील गटात परम देसाई, प्रथम देसाई, अनुज मगदूम, आव्हान पाटील, प्रणील श्‍यजू, अर्ष मुजावर, प्रथमेश सपाटे, पृथ्वीराज पाटील यांचा समावेश होता. संघांना भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षका विजया पाटील, प्रशिक्षक तेजस पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
..........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com