होर्डिग्ज

होर्डिग्ज

83915
कोल्हापूर : विनापरवाना उभारलेले होर्डिंग्जचे स्ट्रक्चर महापालिकेने काढले.

शहरात १७ विनापरवाना होर्डिंग्ज
मार्केट यार्ड येथील दोन हटवले; महापालिकेकडून नोटीस
कोल्हापूर, ता. १५ : महापालिकेने सुरू केलेल्या मोहिमेत आज १७ विनापरवाना होर्डिंग्ज आढळली. त्यातील दोन तातडीने हटवण्यात आली. एकासाठी तर मोठे लोखंडी स्ट्रक्चर उभारले होते. अन्य विनापरवाना होर्डिंग्ज तत्काळ काढून घेण्याचे आदेश दिले असून, ती काढली गेली नाही तर कारवाई केली जाईल, अशा नोटीस दिल्या आहेत.
मुंबईतील दुर्घटनेनंतर प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी शहरातील सर्व होर्डिंग्जची तपासणी करून अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काल तातडीने होर्डिंग्ज असोसिएशनची बैठक झाली. आजपासून शहरातील विविध भागांत इस्टेट विभागातर्फे तपासणी मोहीम राबवण्यात आली. त्यातून १७ होर्डिंग्ज विनापरवाना आढळली. त्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदीनुसार व मालमत्तेच्या विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम १९९५ नुसार शहरातील विनापरवाना होर्डिंग्जधारकांना तत्काळ काढून घेण्यास सांगितले आहे.
महापालिकेच्या तसेच खासगी जागेत, इमारतीवर उभ्या केलेल्या होर्डिंग्जची संख्या मोठी आहे. त्यातही काही इमारतीवर, तसेच जागेत स्ट्रक्चर एकच वापरून जादा होर्डिंग्ज लावण्याचे प्रकार झाले आहेत. त्यातील बहुतांश इमारती, चौक मोठ्या वर्दळीचे आहेत. वर्दळीच्या चौकात, इमारतीवर होर्डिंग्ज लावण्याची मागणी असते. शहरामध्ये लावलेल्या होर्डिंग्जबाबत असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्यांची बैठक झाली. त्यानंतर आज हॉकी स्टेडियम येथील दोन, शाहू टोल नाका एक, शाहू टोल नाका उड्डाण पूल पश्चिम बाजू पाच, जोतिबा हॉटेल कॉर्नर मार्केट यार्ड रोड एक, लिशा हॉटेलजवळ एक, दसरा चौक येथील साधना हॉटेलजवळ दोन, कसबा बावडा भारत पेट्रोल पंप एक, कसबा बावडा शिये रोड एक, श्री मंगल कार्यालय एक, हॉटेल रेणुका एक, इंडियन ऑईल पेट्रोल पंप एक अशा १७ होर्डिंग्जधारकांना नोटीस लागू केल्या. त्याचबरोबर मार्केट यार्ड वाळू अड्डा व मार्केट यार्ड रोडवरील अशी दोन होर्डिंग्ज हटवण्यात आली. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त साधना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इस्टेट अधिकारी विलास साळोखे व कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com