मान्सून पूर्व आढावा बैठक बातमी

मान्सून पूर्व आढावा बैठक बातमी

फोटो 83907

मान्सूनपूर्व कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करा
अमोल येडगे : जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत सूचना

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ ः संभाव्य महापुरापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी मान्सूनपूर्व कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करा, पूरग्रस्त भागातील नागरिकांची यादी करून आवश्यकता भसल्यास त्यांचे स्थलांतर करण्याची तयारी पूर्ण करा, धराणातील पाण्याच्या विसर्गाचेही नियोजन करा, वीज, औषधे, चारा यांची व्यवस्था करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. आज ताराराणी सभागृहात झालेल्या मान्सूनपूर्व कामाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, ‘मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी प्रशासनाकडे तीन आठवडे असून, आवश्यक नालेसफाई, धोकादायक इमारतींबाबत कार्यवाही, रस्ते पुलांचे परीक्षण करून योग्य निर्णय घेणे, नागरिक व पशुधनासाठी निवाऱ्याची सुविधा आदी कामांबाबत तातडीने नियोजन करा, भूस्खलनाचा धोका असणाऱ्या गावांची यादी तयार करून प्रत्यक्ष भेटी देऊन उपाययोजनांबाबत तयारी करा, राष्ट्रीय आपत्ती कृती दल, जिल्हा आपत्ती चमूला कधी पाचारण करायचे, याबाबत तालुकास्तरावर नियोजन करा, याव्यतिरीक्त संभाव्य पूरस्थिती तालुक्यातील आपत्ती निवारणविषयक साहित्याची तपासणी करून ते सुस्थितीत असल्याची खात्री करा, रस्ते, नदी-नाल्यांवरील पूल तसेच आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक लावा, पावसाचा अंदाज यावेळी चांगला असल्यामुळे पूरस्थितीचा विचार करून त्यावर मात करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवा, प्रत्येक गाव आणि शहरांमधील धोकादायक इमारती, होर्डिंग तसेच पावसामध्ये धोका निर्माण होईल, अशी ठिकाणे यांची तपासणी करून कडक कारवाई करून ती हटवा, भीतीचे वातावरण तयार होणार नाही, याचीही काळजी घ्या.’
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अधीक्षक अभियंता पाटबंधारे अभिजित म्हेत्रे, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम शामराव कुंभार, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ उपस्थित होते.

ग्राफ करा
जिल्ह्यातील गेल्या ५ वर्षांतील सरासरी पाऊस (मिलिमीटर)
२०१९- २९३०
२०२०- २०३४
२०२१-१७१९
२०२२-१५५२
२०२३- ११७१
---------
चौकट
जीवितहानी होऊन नये यासाठी नियोजन करा
कोल्हापूर शहरातही मागील वर्षी ४२७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. २०१९ च्या पुरामध्ये जिल्ह्यात पूर्णतः वेढा पडलेली २७ गावे होती. अंशतः ३१८ गावे बाधित झाली होती. २०२१ मध्ये नदीकाठी असणाऱ्या ३९१ गावांमधे पूरस्थिती होती. २०१९ च्या पुरावेळी १२ तालुक्यांमध्ये एकूण १ लाख २ हजार ५५७ कुटुंबांना, तर २०२१ मध्ये ७२ हजार ४११ कुटुंबांना स्थलांतरित केले होते. २०१९ पासून वीज पडून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४, पुरात वाहून गेलेली मनुष्य संख्या १६ आहे, तर १७९ लहान व ४७० मोठी जनावरे दगावली आहेत. सध्या भूस्खलन गावांची संख्या ८६ आहे. या आकडेवारीच्या अनुषंगाने यावेळी कोणतीही जीवितहानी होता कामा, नये यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com