फुलेवाडी भगव्या चौकातील
व्हॉल्वची जागा बदलणार

फुलेवाडी भगव्या चौकातील व्हॉल्वची जागा बदलणार

फुलेवाडी भगव्या चौकातील
व्हॉल्व्हची जागा बदलणार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : फुलेवाडी भगव्या चौकातील रस्त्यात असलेला व्हॉल्व्हची जागा बदलण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गची हद्द निश्‍चित करून दिली जाणार असून त्याप्रमाणे हा व्हॉल्व्ह बसवला जाईल.
सरकारी काम चार महिने थांब या प्रकाराचा अनुभव या व्हॉल्व्हच्या कामाच्या निमित्ताने नागरिकांना आला. थेट पाईपलाईनचा चंबुखडी टाकीला जोड देणाऱ्या पाईपचा व्हॉल्व्ह कुठे लावावा यासाठी ठेकेदाराकडून अक्षरशः दोन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू होता. त्यांच्या पत्रांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या. एकीकडे काम पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडून रेटा सुरू आहे. दुसरीकडे जागा सांगितली नसल्याने व्हॉल्व्ह बसवता येत नाही, अशा कोंडीत ठेकेदार कंपनी होती. शेवटी कंपनीकडून रस्त्यालगतच व्हॉल्व्ह बसवला गेला. तो रस्त्यातच येत असल्याने अपघाताचा धोका वाढला होता. याबाबतची बातमी ‘सकाळ’मधून १० मे रोजी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर सरकारी यंत्रणा जाग्या झाल्या.
राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून, त्या कामात व्हॉल्व्ह येणार असल्याने महामार्गाच्या कामाची रुंदी कुठपर्यंत येणार हे माहिती झाल्याशिवाय व्हॉल्व्ह बदलता येणार नव्हता. त्यामुळे महामार्गाच्या विभागाकडून तातडीने जागा सांगितली जाईल, असे कळविण्यात आले. त्यामुळे रस्त्यात येणारा व्हॉल्व्ह महामार्गाची जागा सोडून बसवला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com