... पुन्हा भरला अकरावीचा वर्ग

... पुन्हा भरला अकरावीचा वर्ग

ajr162.jpg....
84009
आजरा ः येथील महाविद्यालयात स्नेहमेळाव्यानिमित्त एकत्र आलेले १९९९ च्या अकरावी वर्गातील विद्यार्थी व शिक्षक.
-------------------------
... पुन्हा भरला अकरावीचा वर्ग
दोन तपानंतर आले एकत्र ः आजरा महाविद्यालयात स्नेहमेळावा
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १६ ः कोणी पोलिस, कोणी प्राध्यापक, तर कोणी उद्योजक अशा वेगवेगळ्या भूमिकेत सध्या वावरत असलेले १९९९ च्या आजरा महाविद्यालयातील अकरावीच्या वर्गातील विद्यार्थी चोवीस वर्षांनंतर एकत्र आले. येथील आजरा महाविद्यालयात त्यांचा स्नेहमेळावा झाला.
सागर सुतार, संतोष राणे यांच्यासह सहकाऱ्यांनी व्हॉटस्‌ॲप ग्रुपच्या माध्यमातून स्नेहमेळाव्यासाठी पुढाकार घेतला. आजरा महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ, माजी उपप्राचार्य प्रा. राजीव टोपले, ज्येष्ठ शिक्षक प्रा. के. व्ही. पाटील, प्रा. टी. एस. दुर्गी, प्रा. मधुकर भारती, प्रा. विनायक चव्हाण यांचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले. शिक्षकांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. शिक्षकांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करत मैत्रीची ताकद काय असते याची उदाहरणे देत अनुभव कथन केले. अनेकांनी आपल्या जीवनाचा प्रवास उलगडला. बाळासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. संजय पोवार यांनी सूत्रसंचालन केले. हंबीरराव अडकुरकर यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com