सांस्कृतिक कोल्हापूर

सांस्कृतिक कोल्हापूर

लोगो - सांस्कृतिक कोल्हापूर
-----------
84073
सुनील पंडित यांच्या प्रदर्शनातील एक कलाकृती.

सुनील पंडित यांच्या
कलाकृतींचे उद्यापासून प्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : येथील ज्येष्ठ चित्रकार सुनील पंडित यांच्या कलाकृतींच्या ‘चित्रमेळ’ या प्रदर्शनाला शनिवार (ता.१८) पासून प्रारंभ होणार आहे. दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनात सलग आठ दिवस प्रदर्शन होणार आहे. शनिवारी (ता.१८) सायंकाळी पाच वाजता उद्योजक राहुल बुधले यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‍घाटन होईल. यावेळी रवींद्र उबेरॉय, डॉ. राज होळकर, शिवाजी मस्के, विजय टिपुगडे यांची प्रमुख उपस्थिती असेल. प्रदर्शनात पंडित यांच्या कलाकृतींचा समावेश असेल. शारदा कलादालनाच्या ६६ व्या वर्धापनदिनानिमित्त मुद्रित भाषा संशोधन मंडळ (पुणे) यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन होणार आहे.
-----------------
स्वयंप्रेरिका संस्थेतर्फे
मंगळवारी स्टेज शोचे आयोजन
कोल्हापूर, ता. १६ : येथील स्वयंप्रेरिका महिला सहकारी औद्योगिक संस्थेतर्फे मंगळवारी (ता.२१) दोन एकांकिकांचे आयोजन केले आहे. दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनात सायंकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेत या एकांकिका सादर होतील. या स्टेज शोच्या प्रवेशिका संस्थेच्या साईक्स एक्स्टेन्शन येथील कार्यालयात उपलब्ध केल्या आहेत. सीमा पोंक्षे दिग्दर्शित, विनिता पिंपळखरे लिखित ‘आम्ही दोघी विहीनी तोडीच्या’ आणि मृणालिनी चितळे लिखित ‘किटी पार्टी’ या दोन एकांकिका पुण्यातील नाट्यपुष्प ही संस्था सादर करणार आहेत.
----------------
जिल्ह्यातील कवींना आवाहन
कोल्हापूर, ता. १६ : येथील कदंब महोत्सव समितीतर्फे सलग चौदाव्या वर्षी कदंब महोत्सव होणार आहे. महोत्सवात सलग अकराव्या वर्षी कदंब पुरस्कार दिला जाणार आहे. कविता या साहित्यप्रकारासाठी हा पुरस्कार दिला जाणार असून, एक जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेले कवितासंग्रह पुरस्कारासाठी पाठवायचे आहेत. इच्छुकांनी कविता संग्रहाच्या दोन प्रती आपल्या संपूर्ण माहितीसाठी महाराष्ट्र ग्रंथ भांडार (महाद्वार रोड, कोल्हापूर) या पत्त्यावर पाठवाव्यात, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com