सायबर वॉचने केले वेळीच सावध !

सायबर वॉचने केले वेळीच सावध !

लोकसभा निवडणुकीत ‘सायबर वॉच’ ठरला मह़त्त्‍वाचा
एक गुन्हा दाखल, दोन तक्रारी; अनेक पोस्ट टाकल्या काढून

लुमाकांत नलवडे : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : लोकसभा निवडणूक काळात सोशल मीडियावरील सायबर सेलचा वॉच यावेळी महत्त्‍वाचा ठरला. ज्या पोस्टमधून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल, अशा पोस्ट या सेलने टाकल्‍या आहेत. एवढंच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोंदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चेहरे वापरून व्हायरल झालेल्या पोस्टवरून जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे.
सोशल मीडिया कोणाच्याही हाती राहिलेला नाही. सोशल मीडिया वापरणारे काहीजण या माध्यमातून आपले विचार किंवा इतरांची निंदानालस्ती करतात. त्यावर कमेंट येतात. त्यावर चर्चा होते. काही अक्षेपार्ह पोस्टमुळे राजकीय वाद होऊ शकतो, कायदा सुव्यवस्था बिघडू शकते, बदनामी होऊ शकते. निवडणूक कालावधीत असा प्रकार झाल्यास त्याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो. परिणामी, असे होऊ नये म्हणून सायबर सेलकडून लोकसभा निवडणुकीत काळजी घेण्यात आली.
पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलमधून जिल्ह्यातील सोशल मीडियावर वॉच ठेवला जात होता. २४ बाय ७ हा सेल कार्यरत होता. त्यामुळे निवडणूक काळात साधारण दहाहून अधिक पोस्ट सायबर सेलकडून काढून टाकल्या आहेत. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांचे चेहरे वापरून धार्मिक भावना दुखावण्‍यासंदर्भात प्रयत्न झाला होता. आमदार सतेज पाटील यांनीही महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची बदनामी झाल्याची तक्रार थेट पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. त्याचाही तपास पुढे सुरू आहे. तसेच राजारामपुरीमध्येही एक तक्रार असून, त्याचाही तपास सुरू आहे. त्यामध्येही मूळ चित्रफितीत बदल करून त्या एका उमेदवारासाठी व्हायरल केल्या आहेत. त्या पोस्ट कोणी व्हायरल केल्या, तयार कोठे झाल्या, याचाही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कोट
लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत सोशल मीडियावरील पोस्टवर सायबर सेलचा वॉच होता. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल, अशा पोस्ट काढून टाकल्या. एका पोस्टबाबत फिर्याद होती. त्यानुसार सायबर सेलकडून संबंधित व्यक्तीवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अटक होऊन न्यायालयीन कोठडीही मिळाली आहे.
-नितीन सावंत, पोलिस निरीक्षक, सायबर सेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com