उन्हाळी सुटीत एसटीने कमावले २५ कोटी ३७ लाख

उन्हाळी सुटीत एसटीने कमावले २५ कोटी ३७ लाख

एस. टी. चे संग्रहित छायाचित्र वापरावे.
....
उन्हाळी सुटीत एसटीने कमावले २५ कोटी ३७ लाख

कोल्हापूर विभागातर्फे विशेष गाड्यांची सोय

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : लालपरीने उन्हाळी सुटीच्या हंगामात २५ कोटी ३७ लाख ५० हजार ५३७ रुपयांची कमाई केली आहे. विभागातील एकूण ७४१ गाड्या विविध मार्गांवर नॉन स्टॉप धावत असून, पर्यटनाची मौज लुटण्यासाठी जादा गाड्या सोडण्यात येत असल्याने पर्यटकांचा ओघ लालपरीकडे जास्त असल्याचे ठळकपणे दिसत आहे. कोल्हापूर विभागांतर्गत सुटणाऱ्या जिल्ह्यातील सर्व आगारांनी दिलेल्या सेवेचा परिणाम म्हणून महिनाभरात लालपरीने कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नाचा आकडा गाठला आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातर्फे उन्हाळी हंगामासाठी विशेष गाड्यांची सोय केली आहे. उन्हाळी हंगामातील गाड्यांना १५ एप्रिलपासून सुरुवात झाली. बीड, परभणी, औरंगाबाद, दांडेली, शिर्डी, बुढ्ढापूरसह खिद्रापूर, नृसिंहवाडी, जोतिबा, आळते येथे या गाड्या सोडण्यात येऊ लागल्या. शिवाय अन्य गाड्याही उन्हाळी हंगामासाठी सज्ज झाल्या. इचलकरंजी, गारगोटी, सांगली, गडहिंग्लज, गारगोटी मार्गांवरील गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात गेल्या. लांब पल्ल्ल्याच्या मार्गावरील गाड्यांची चाकेही पर्यटनासाठी धावू लागली. त्याचा परिणाम म्हणून १६ ते ३० एप्रिल दरम्यान गाड्यांनी ४० लाख किलोमीटर अंतर कापले, तर १३ कोटी ५७ लाख १५ हजार ३२३ रुपयांची कमाई केली. त्याचप्रमाणे १ मे ते १५ मे दरम्यान पर्यटनासाठी प्रवाशांचा ओघ वाढला. प्रवाशांना चांगली सेवा देत या कालावधीत ११ कोटी ८० लाख ३५ हजार २१४ रुपयांचे उत्पन्न मिळवले. तसेच ३३ लाख २२ हजार ६९५ किलोमीटर अंतर कापले. मे महिन्याच्या मध्यापर्यंत लालपरीने उत्पन्नाचा आकडा ठळक केला आहे. मे अखेरीस या आकड्यात आणखी भर पडणार असून, तो कितीपर्यंत पोहोचतो, याची विभागाला प्रतीक्षा आहे.
...................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com