पाण्याच्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू

पाण्याच्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू

फोटो 84078

सुटीसाठी मावशीकडे आलेल्या
मुलाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बांबवडे ता. १६ ः उन्हाळी सुटीसाठी बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे मावशीकडे आलेला सर्वेश सुनील राऊत (वय १०, रा. जवाहरनगर, इचलकरंजी) याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला. बेशुद्धावस्थेत त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सर्वेश मावशीकडे उन्हाळी सुटीसाठी राहायला आला होता. बुधवारी सायंकाळी घराजवळ खेळताना बॉल शेजारील पाण्याच्या टाकीत पडला. हा बॉल काढण्यासाठी तो गेला असताना तोल जाऊन पाण्याच्या टाकीत पडला. त्याचे नातेवाईक निवास चौगुले यांना हे कळताच त्यांनी तातडीने सर्वेशला पाण्याबाहेर काढून उपचारासाठी कोल्हापूर येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com