नियमबाह्य गतिरोधक हटवण्यास प्रारंभ

नियमबाह्य गतिरोधक हटवण्यास प्रारंभ

ich162.jpg
84081
इचलकरंजी ः शहरातील मुख्य मार्गावर असलेले बहुतांश गतिरोधक हटवण्यात आले.

नियमबाह्य गतिरोधक हटवण्यास प्रारंभ
अपघातास ठरत होते कारणीभूत ः इचलकरंजी महापालिकेकडून कार्यवाही
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १६ ः शहरातील बहुतांशी रस्त्यावर नियमबाह्य गतिरोधक आहेत. त्यातील अनेक अपघाताला कारणीभूत ठरत होते. त्यामुळे ते हटवण्यास महापालिकेकडून सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात अत्यंत वर्दळ असलेल्या मुख्य मार्गावरील गतिरोधक हटवले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी असलेला गतिरोधकाचा अडथळा दूर झाला असून वाहन चालविताना अधिक सुलभता येणार आहे.
वाहनांच्या वेगावर मर्यादा ठेवण्यासाठी रस्त्यावर आवश्यक ठिकाणी गतिरोधक करण्यात येतात. इचलकरंजी शहरातही वर्दळीच्या मार्गावर अनेक गतिरोधक आहेत. पण यातील अनेक गतिरोधक नियमानुसार नाहीत. त्यामुळे असे गतिरोधक अपघाताला निमंत्रण देत आहेत. तर वाहनधारकांनाही कसरत करावी लागत आहे. गतिरोधक केले आहेत. मात्र त्यावर पांढरे पट्टे नसल्यामुळे वाहनचालकांच्या सहजासहजी लक्षात येत नाही. त्यामुळे चालकांना आकस्मिक वाहन थांबविण्याची वेळ येते. परिणामी, पाठीमागून येणाऱ्या वाहनांच्या चालकांचा ताबा सुटतो व अपघात होण्याचा धोका संभवतो.
याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आयुक्त दिवटे यांनी शासन नियमाप्रमाणे नसलेले गतिरोधक हटवण्याच्या सूचना बांधकाम विभागास दिल्या. त्यानुसार आतापर्यंत ३० गतिरोधक हटवले आहेत. राजर्षी शाहू पुतळा ते महापालिका आणि राजवाडा चौक ते सांगली नाका या मुख्य मार्गावरील गतिरोधक काढले. अन्य उपमार्गावरीलही गतिरोधक काढण्याची आवश्यकता आहे. मात्र त्याबाबत अद्याप नियोजन नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. लवकरच नियमानुसार आवश्यक ठिकाणी गतिरोधक केले जाणार असून तेथे माहिती फलक लावले जाणार आहेत.
------
मनात आले, गतिरोधक केले
मुख्य मार्गावर वर्दळ असते. त्यामुळे आवश्यक ठिकाणी गतिरोधक केले जातात. त्यामुळे वाहनांच्या अतीवेगामुळे होणारे अपघात टाळता येतात; पण अंतर्गत रस्त्यावर डांबरीकरण करताना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आग्रहासाठी आवश्यक नसतानाही अनेक गतिरोधक केले आहेत. त्यामुळे अगदी थोड्या-थोड्या अंतरावरही भले मोठे गतिरोधक केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com