आयुक्तांनी विभागांची बैठक घेऊन घेतली झाडाझडती

आयुक्तांनी विभागांची बैठक घेऊन घेतली झाडाझडती

सर्व बातम्या एकेठिकाणी वापरणे....

लोगो ः इचलकरंजी महापालिका वृत्त
............................

84094
इचलकरंजी ः महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी एसटीपी प्रकल्पाची अचानक पाहणी केली.

एसटीपी प्रकल्पास दिली
आयुक्तांची अचानक भेट
इचलकरंजी, ता. १६ ः आसरानगर येथे असलेल्या एसटीपी प्रकल्पास आज सांयकाळी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी हा प्रकल्प पूर्णक्षमतेने सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रकल्पात येणारे सांडपाणी व त्यावर प्रक्रिया केल्यानंतर पाहेर पडणारे पाणी या प्रक्रियेची त्यांनी पाहणी केली. यावेळी उपायुक्त सोमनाथ आढाव, कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, अभियंता बाजी कांबळे उपस्थित होते.
शहरात निर्माण होणारे सांडपाणी टाकवडे वेसमधील संप व पंप हाऊसमध्ये जमा होते. तेथून सांडपाणी आसरानगरमधील एसटीपी प्रकल्पात पाठविले जाते. तेथे सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. तथापि, पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी सतत इचलकरंजी शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याकडे लक्ष वेधले जाते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेळोवेळी या प्रकल्पाची पाहणी केली आहे. प्रकल्प बंद असल्याचा अहवाल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यांनी याबाबत इचलकरंजी महापालिकेकडे विचारणा केली. त्याची खातरजमा करण्यासाठी आयुक्त दिवटे यांनी प्रकल्पावर अचानक धडक दिली. यावेळी त्यांना प्रकल्प पूर्णक्षमतेने सुरू असल्याचे दिसून आले. तशी माहिती त्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिली.
०००००००००००००००
84107
इचलकरंजी ः उपायुक्त स्मृती पाटील यांच्याशी नागरी असुविधांप्रश्नी चर्चा करताना प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिक.
......
प्रभाग १७ मधील नागरिकांची
असुविधांप्रश्नी अधिकाऱ्यांना घेराव

इचलकरंजी, ता. १६ ः येथील प्रभाग क्रमांक १७ मधील दैनंदिन साफसफाई, स्वच्छता व नागरी सुविधांसंदर्भात वारंवार मागणी करूनही महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्षच केले जात असल्याने भागातील संतप्त नागरिकांनी महापालिकेवर धडक दिली. उपायुक्त प्रसाद काटकर आणि स्मृती पाटील यांना घेराव घालत या भागातील प्रश्‍नांची तातडीने निर्गत न केल्यास महापालिकेच्या प्रवेशद्वारात उपोषण करण्याचा इशारा दिला.
प्रभागात साईट क्र. १०२, आसरानगर, कामगार वस्ती, मळेभाग, वृंदावन, सुरभी, निशिगंधा, गुलमोहोर, शिक्षक कॉलनी, सहकारनगर, वडगाव बाजार समिती या भागात दैनंदिन स्वच्छता आणि साफसफाईची वानवा आहे. त्याचबरोबर या भागात असलेल्या सार्वजनिक शौचलयांची दुरवस्था झाली आहे. शिवाय सांडपाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनत आहे. याप्रश्नी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे महापालिकेत येऊन याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. माजी आरोग्य सभापती संजय केंगार, पप्पू दास यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.
०००००००००००००

आयुक्तांनी विभागांची बैठक घेऊन घेतली झाडाझडती

इचलकरंजी, ता. १६ ः लोकसभा निवडणुकीनंतर महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात शिथिलता आली आहे. त्यामुळे आज आयुक्तांनी विविध विभागांची बैठक घेऊन झाडाझडती घेतली. यावेळी विविध कामांचा आढावा घेऊन वेळेत कामे निर्गत करण्याची सूचना केली. आज दिवसभरात पाच विभागांची बैठक झाली. उद्या (शुक्रवार) उर्वरित विभागांची बैठक घेणार आहेत.
लोकसभा निवडणूक कामात महापालिकेचे बहुतांशी अधिकारी व कर्मचारी व्यस्त होते. त्यामुळे गेला महिनाभर महापालिकेचे प्रशासकीय कामकाज ठप्प होते. पाणीपुरवठा, स्वच्छता आदी कामे विस्कळीत झाली आहेत. प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिवसभरात पाच विभागांच्या बैठका घेत कामकाजाचा आढावा घेतला. विविध कामकाजाबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. त्याकडे लक्ष वेधत कामकाज अधिक गतीने होण्यासाठी सर्वांची आयुक्तांनी झाडाझडती घेतल्याचे समजते. नागरिकांची कामे वेळेवर करण्यासह विकासकामांना गती देण्याबाबत त्यांनी संबंधितांना सक्त सूचना दिल्याचे सांगण्यात आले. दिवसभरात पाणीपुरवठा, आस्थापना, मिळकत, विद्युत व नगररचना विभागांच्या बैठका झाल्या आहेत. उद्या बांधकाम, आरोग्य, लेखा आदी विभागाच्या बैठका होणार आहे.
००००००००००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com