२१ पथनाट्ये, शंभराहून अधिक व्याख्यानांतून अवयवदानाचा जागर

२१ पथनाट्ये, शंभराहून अधिक व्याख्यानांतून अवयवदानाचा जागर

शंभरहून अधिक व्याख्याने,
एकवीस पथनाट्यांतून जागर
नऊ वर्षे जिल्ह्यात होतोय अवयवदानाबाबत प्रबोधन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : दि फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲंड बॉडी डोनेशनच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षांत तब्बल एकवीस पथनाट्ये आणि शंभराहून अधिक व्याख्यानांच्या माध्यमातून अवयवदानाबाबत जागर मांडला गेला आहे. त्यामुळे आता अवयवदान करण्यासाठी लोक स्वयंस्फूर्तीने पुढे येत असल्याची माहिती जिल्हा समन्वयक योगेश अग्रवाल यांनी दिली.
ठाणे जिल्ह्यातील वसई देहमुक्ती मिशन संस्थेच्या माध्यमातून अवयवदान, देहदान या क्षेत्रात संस्थापक पुरुषोत्तम पवार कार्यरत आहेत. त्यांनीच १७ मे २०१५ रोजी फेडरेशनची स्थापना केली आणि सर्व जिल्ह्यात काम सुरू झाले. फेडरेशनच्या माध्यमातून सर्व स्थानिक संस्था एकवटल्या आणि काम सुरू झाले. भारतात ज्यांच्यावर २००३ साली यशस्वी यकृत प्रत्यारोपण झाले ते नाशिकचे डॉ. भाऊसाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ते आनंदवन, मुंबई ते गोवा, औरंगाबाद ते तुळजापूर, नाशिक ते बेळगाव, खानदेश-धुळे-नंदूरबार आदी ठिकाणी पदयात्रा काढून जनजागृती मोहीम राबवण्यात आली.
कोरोना काळात मात्र काही मर्यादा आल्या. मात्र, झूम मीटिंग, गुगलमीटच्या माध्यमातून ऑनलाईन कार्यक्रमांवर भर देण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला, तर एकवीस पथनाट्ये, एकशे चार व्याख्याने, अवयवदान पत्रिकेच्या ९६ आवृत्ती, पंचवीस योगा शिबिरे, चाळीसहून अधिक अवयवदानावरील कवितांच्या माध्यमातून प्रबोधन झाले आणि येत्या काळातही ते अधिक व्यापक केले जाणार असल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com