तीन महिलांचे जटा निर्मुलन

तीन महिलांचे जटा निर्मुलन

84105
कोल्हापूर : विविध सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने एकाच दिवशी तीन महिलांचे जटा निर्मूलन झाले. त्यानंतर त्यांचे सत्कार झाले.

विविध संस्थांतर्फे एकाच दिवशी
तीन महिलांचे जटा निर्मूलन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : येथील विविध सामाजिक संस्‍थांच्या पुढाकाराने शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रात काम करणाऱ्या तीन सफाई कामगार महिलांचे एकाचवेळी जटा निर्मूलन झाले. बाळाबाई, रेणुकाताई आणि सखुबाई अशी या तिघींची नावे आहेत. तिघीही एकाच वयोगटांतील आणि त्यांच्या डोक्यातील जटा असल्याचे लक्षात येताच जटा निर्मूलन करण्याचा निर्णय झाला. शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव व्ही. एन. शिंदे यांच्या परवानगीने ही मोहीम झाली.
जटा निर्मूलन करताना लागणाऱ्या आरोग्यविषयक गोष्टीची पूर्तता करत आनंदाने तिघीनींही सहकार्य केले. आरोग्य विभाग, ‘एनएसएस’चे कर्मचारी यांच्या उपस्थितीत जटा निर्मूलन झाले. अनारोग्य, शिक्षणाचा अभाव आर्थिक परिस्थिती आणि त्यातून अंधश्रद्धेचा पगडा यामुळे जटा राखल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गीता हसूरकर, यश आंबोळे, विद्यापीठ सिनेट सदस्य अभिषेक मिठारी आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com