

chd201.jpg
84683
चंदगड ः ताम्रपर्णी घाटाची स्वच्छता करताना स्वयंसेवक.
---------------------
चंदगडला ताम्रपर्णी घाट झाला चकाचक
तरुणांकडून स्वच्छता ः ‘सकाळ’च्या आवाहनाला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २१ ः येथील ताम्रपर्णी नदीघाटाची तरुणांनी स्वच्छता केली. प्लास्टिक, जुने कपडे, राख, अस्थी आदी कचरा मोठ्या प्रमाणात काढला. घाटाच्या पायऱ्यांवर ठेवलेले देवीदेवतांचे जुने फोटोही जमा केले. सुमारे दोन तासांच्या स्वच्छतेतून घाट चकाचक झाला. नदीचे स्वच्छ पाणी, झाडून स्वच्छ केलेला घाट यामुळे मन प्रसन्न करणारे चित्र तयार झाले.
‘सकाळ’मधून यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध झाले होते. तरुणांनी घाटाची स्वच्छता करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत ही स्वच्छता केली. शहरापासून सुमारे दीड किमीवर ताम्रपर्णी घाट आहे. पूर्वी येथे नागरिक पहाटे अंघोळ करीत असत. लहान मुले येथेच पोहायला शिकत. महिला कपडे धुण्यासाठी याच घाटाचा वापर करीत असत. नळपाणी योजना सुरू झाल्यानंतर घाटाकडे दुर्लक्ष झाले. अलीकडे तर घरातील कचरा टाकण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे घाट अशी स्थिती तयार झाली. पाण्यातून वाहून येणारे प्लास्टिक येथे झाडाझुडपात अडकून राहू लागले. घाटाला लागूनच स्मशानभूमी असून मृत व्यक्तीची राख व अस्थी विसर्जन येथेच होऊ लागले. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण वाढले. यासंदर्भात लक्ष वेधल्यानंतर चंदगड अर्बन बॅंकेचे संचालक सुनील काणेकर यांच्या पुढाकाराने तरुणांनी घाटाची स्वच्छता मोहीम राबवली. यामध्ये विवेक सबनीस, बाबूराव बल्लाळ, संजय काणेकर, अमित जाधव, संजय कुंभार, महेश जाधव, उमेश जाधव, सुरेश पेडणेकर, पांडुरंग मयेकर यांच्यासह स्वयंसेवकांचा सहभाग होता.
--------------
आपल्या श्रद्धास्थानांचं पावित्र्य आपणच राखायला हवे. नागरिक अज्ञानातून घरातील कचरा नदीत फेकतात. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यांनी केलेली घाण स्वयंसेवकांनी काढायची ही पद्धत चुकीची आहे. आपल्या घरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
- सुनील काणेकर, सामाजिक कार्यकर्ते, चंदगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.