

‘रेस्क्यू व्हॅन’ मिळणार तरी कधी?
‘आपत्ती व्यवस्थापन’ला तीन वर्षांपासून प्रतीक्षाः राज्य शासनाकडे निधीची मागणी, गेल्या महिन्यात पाठविला फेरप्रस्ताव
प्रवीण देसाई ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : पावसाळा तोंडावर आला आहे. अधूनमधून वळीव जोरदार हजेरी लावत आहे. ही पावसाची चाहूलच म्हणावी लागेल. यासह संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे. परंतु, पूरपरिस्थितीत मदतकार्यात आणखी गतिमानता यावी, यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाला ‘रेस्क्यू व्हॅन’ची आवश्यकता आहे. त्यासाठी सुमारे एक कोटीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी राज्य शासनाकडे निधीची मागणी केली आहे. त्याचा पाठपुरावाही सुरू आहे. नुकताच महिन्यापूर्वी फेरप्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे या पावसाळ्यापूर्वी तरी ही व्हॅन दाखल होते का, याची प्रतीक्षा आहे.
सध्या महापालिकेकडे अशा प्रकारची ‘रेस्क्यू व्हॅन’ उपलब्ध आहे. त्याचा उपयोग शहरासाठी होत आहे. परंतु, ग्रामीण भागातही आपत्तीमध्ये गतिमान पद्धतीने मदतकार्य करता यावे, यासाठी अशा प्रकारच्या व्हॅनची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या ताफ्यात गरज आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वी संभाव्य पूरपरिस्थितीचा आढावा घेताना, जिल्हा प्रशासनाने रेस्क्यू व्हॅनसाठी निधीची मागणी सरकारकडे केली आहे. त्यासाठी सुमारे एक कोटीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या रेस्क्यू व्हॅनमध्ये बोट, लाईफ जॅकेट, कटर, रोप, दोऱ्या आदी साहित्य सज्ज असते. यावर जवळपास सहा आपत्ती व्यवस्थापनचे जवान बसू शकतील इतकी क्षमता आहे. पूरपरिस्थिती किंवा एखादी दुर्घटना घडल्यास आपत्ती व्यवस्थापनच्या वाहनात साहित्य भरल्यानंतरच ती घटनास्थळी रवाना होते. यामुळे घटनास्थळी पोहोचण्यासाठी थोडा वेळ लागतो. याउलट रेस्क्यू व्हॅनवर सर्व साहित्य सज्ज असल्याने, दुर्घटनेची वर्दी आल्यावर काही क्षणातच ही व्हॅन रवाना होऊ शकते. यामुळे वेळ वाचतो. तसेच लवकरात लवकर जागेवर जाऊन मदतकार्य करता येते. अशा सुविधा असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून रेस्क्यू व्हॅनची मागणी होत आहे.
...
‘महापुरासह अन्य आपत्तीमध्ये जलदगतीने पोहोचून मदतकार्य करण्यासाठी ‘रेस्क्यू व्हॅन’ची गरज आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे अशी सुसज्ज व्हॅन नाही. अशा व्हॅनसाठी तीन वर्षांपूर्वी राज्य शासनाकडे निधीची मागणी केली आहे. त्यासाठी अंदाजे एक कोटीचे अंदाजपत्रकही तयार केले आहे. यासाठी गेल्या महिन्यात पुन्हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या पावसाळ्यापूर्वी ही व्हॅन आल्यास मदत कार्यात चांगली मदत होणार आहे.
- प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.