भाजप अभियंता सेल कार्यकारिणी जाहीर

भाजप अभियंता सेल कार्यकारिणी जाहीर
Published on

भाजप अभियंता सेल
कार्यकारिणी जाहीर
गडहिंग्लज ः भाजपच्या अभियंता सेलची जिल्हा (ग्रामीण पश्चिम) कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी जाहीर केली आहे. उपाध्यक्ष म्हणून अजित उत्तुरकर यांना संधी दिली आहे. गडहिंग्लज मंडल पूर्व संयोजकपदी रमेश गायकवाड व पश्चिम संयोजक म्हणून अशोक रोटे यांची निवड केली. आजरा मंडल संयोजकपदी सुयश लोखंडे, भुदरगड मंडल संयोजकपदी अंकुश गोजारे, सहसंयोजकपदी राजेश चौगुले, तर सदस्यपदी राजेंद्रकुमार पाटील व अमर हिडदुग्गी यांची निवड केली आहे. सर्वांना सावंत यांनी निवडीची पत्रे दिली आहेत.
---------------------------------------------

लाभार्थ्यांना
संपर्काचे आवाहन
गडहिंग्लज ः पी. एम. विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांनी ठाकरे शिवसेनेशी संपर्क साधण्याचे आवाहन उपशहरप्रमुख काशीनाथ गडकरी यांनी केले आहे. आठ महिन्यांपूर्वी केंद्र शासनाने या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. ऑनलाईन अर्ज करणाऱ्यांना अद्याप लाभ मिळाला नसल्याची तक्रार शिवसेनेतर्फे केली होती. त्याची दखल घेऊन जिल्हा उद्योग अधिकारी जोंजाळ यांनी गडकरी व अभिजित पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. तालुक्यातील ऑनलाईन अर्ज केलेल्या लाभार्थींना रजिस्टर फॉर्म, आधार कार्ड, रेशन कार्डसह शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांच्या कडगाव रोडवरील कार्यालय किंवा शहरप्रमुख संतोष चिकोडे, उपशहरप्रमुख गडकरी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com